आमदार अपात्रतेच्या मुद्यावर बुधवार, १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी या प्रकरणी अंतिम निर्णयाचे विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात वाचन केले. त्यावेळी महत्वाचा निर्णय दिला. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या पक्ष घटना. नेतृत्व आणि संघटन फळी या तीन मुद्यावर निकाल दिला. त्यामध्ये शिवसेनेची २०१८ नंतरच्या पक्ष घटनेत केलेल्या बदलावरून नेतृत्वाची फळी अस्पष्ट होत नाही.
(हेही वाचा MLA Disqualification Case : शिंदे गट हीच खरी शिवसेना; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अंतिम निर्णय)
विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाने दिलेली २०१८ ची नाही तर १९९९ ची घटना ग्राह्य असल्याचे म्हटले आहे. २०१८ ची घटना मान्य करण्य़ाची ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे. २०१८ सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची १९९९ सालची आहे. दोन्ही गटाकडे घटनेची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्यांनी ती दिली नाही. यामुळे आयोगाकडचीच घटना ग्राह्य धरली जाईल. २०१८ सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात येत आहे, असे नार्वेकर म्हणाले.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर?
- शिंदे गट खरी शिवसेना आहे.
- भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
- एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
- ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
- सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.!
‘हे’ सर्व आमदार पात्रच
- एकनाथ शिंदे
- अब्दुल सत्तार
- संदीपान भुमरे
- संजय शिरसाट
- तानाजी सावंत
- यामिनी जाधव
- चिमणराव पाटील
- भरत गोगावले
- लता सोनावणे
- प्रकाश सुर्वे
- बालाजी किणीकर
- अनिल बाबर
- महेश शिंदे
- संजय रायमुलकर
- रमेश बोरनारे
- बालाजी कल्याणकर
Join Our WhatsApp Community