Amit Thackeray यांचे पक्षाच्या संघटनात्मक कामाकडे अधिक लक्ष

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आता पक्षाची सुत्रे आता हाती घेत संघटनांत्मक बांधणी करण्याचा प्रयत्न करत असून मुंबई बाहेरील संघटनेच्या कामांकडे अमित ठाकरे विशेष लक्ष देत असल्याचे पहायला मिळत आहे.

298
Amit Thackeray : ना भांडुप, ना वरळी; अमित ठाकरेंसाठी माहीमच सरस

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आता पक्षाची सुत्रे आता हाती घेत संघटनांत्मक बांधणी करण्याचा प्रयत्न करत असून मुंबई बाहेरील संघटनेच्या कामांकडे अमित ठाकरे विशेष लक्ष देत असल्याचे पहायला मिळत आहे. मनसेचे पदाधिकारी तथा माथाडी नेते महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचे नाव घेतल्यामुळे मनसेच्या संघटनात्मक कामांमध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहे. (Amit Thackeray)

शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजकारणात प्रवेश करत युवा सेना आणि शिवसेनेच्या नेतेपदाची जबाबदारी सांभाळत एकप्रकारे पक्षाच्या संघटनात्मक कामांमध्ये सक्रीय होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या नंतर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पुत्राला राजकारणात उतरवले. जानेवारी २०२०मध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राजकारणात प्रवेश करत युवा नेते म्हणून काम करू लागले. एरव्ही जाहीर सभांमध्ये मागे बसणारे अमित ठाकरे (Amit Thackeray) आता पक्षाच्या संघटनात्मक बाबींकडे आता लक्ष देऊ लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबईतील सर्व शाखांमध्ये भेटी देऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मागील अनेक वर्षांपासून मनसेची पक्षावरील पकड कमी होत आहे. त्यामुळेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा सक्रीय करून घेण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंबईत अमित ठाकरे यांचा हा हस्तक्षेप काही स्वयंभू नेत्यांना रुजला नाही आणि पुढे अमित ठाकरे यांनीही मग ही नाराजी अधिक ओढवून न घेता शाखाशाखांना भेटण्याचा कार्यक्रम गुंडाळून ठेवला होता. (Amit Thackeray)

(हेही वाचा – Uddhav Thackeray : ही तर मॅच फिक्सिंग; हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान; उद्धव ठाकरेंची टीका)

अमित ठाकरे यांनी हाती घेतली पक्षाची काही सुत्रे 

परंतु आत अमित ठाकरे (Amit Thackeray) मुंबई वगळता अन्य ठिकाणी पक्षाच्या बांधणीत लक्ष घालण्यात सुरुवात करत आहेत, असे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत असून मुंबई बाहेरील पक्षाच्या संघटनात्मक नेमणुकांमध्येही आता अमित ठाकरे लक्ष घालत असल्याचे दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसेचे पदाधिकारी तथा माथाडी नेते महेश जाधव यांनी आपल्याला दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासह इतर काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच मोबाईल फोनवरील संवादामध्ये अमित ठाकरे यांनी महेश जाधव (Mahesh Jadhav) यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते आणि कशाप्रकारे तातडीने उपस्थित राहावे अशाप्रकारची सूचना केल्याचे ऐकायला मिळाले. त्यामुळे अमित ठाकरे यांनी पक्षाची काही सुत्रे आपल्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षांत सभांमध्ये मागे राहणारे अमित ठाकरे हे आता पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामांवर अधिक लक्ष ठेवून आहेत, तसेच पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाणार नाही यावर अधिक लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. (Amit Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.