Boycott Maldives: ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम समितीकडून ‘बॉयकॉट मालदीव’ मोहिमेला पाठिंबा, पर्यटन व्यापार संघटनांना आवाहन

देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम महत्त्वाचं आहे. त्यामुळे मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा निषेध करत आहे, असे मत हिमश्री ट्रेक अँण्ड टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर देवेंद्र गंद्रे यांनी व्यक्त केले आहे.

508
Boycott Maldives: ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम समितीकडून 'बॉयकॉट मालदीव' मोहिमेला पाठिंबा, पर्यटन व्यापार संघटनांना आवाहन
Boycott Maldives: ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम समितीकडून 'बॉयकॉट मालदीव' मोहिमेला पाठिंबा, पर्यटन व्यापार संघटनांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा करून त्याचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले होते. यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. त्यामुळे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. (Boycott Maldives)

‘बॉयकॉट मालदीव’ आणि ‘लक्षद्वीप’ हे भारतात सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या विषयांना चित्रपट आणि कला जगतातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. सोशल मिडियाद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून मालदीवला बॉयकॉट करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम विभागाकडून मालदीववर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

(हेही वाचा – BMC : येत्या रविवारी उद्यानात गुंजणार संगीताचे सूर )

हिंद महासागर क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे…
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) विमानचालन आणि पर्यटन समितीच्या वतीने पर्यटन व्यापार संघटनांना आवाहन केले आहे की, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ), ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (टीएएआय), ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (टीएएफआय), अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एटीओएआय), असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर्स (एडीटीओआय) आणि एमआयसीई एजंट्स यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भारतविरोधी भावना लक्षात घेऊन मालदीवचा प्रचार करणे थांबवावे. मालदीवमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विमान कंपन्यांनी त्यांचे कामकाज स्थगित करावे आणि उडान योजनेंतर्गत लक्षद्वीप बेटांवर काम करण्याचा गंभीरपणे विचार करावा. एफ. एच. आर. ए. आय. आणि हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी लक्षद्वीप बेटांमध्ये गुंतवणूक करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे कारण भविष्यात ते तुम्हाला मालदीवपेक्षा तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देईल. पर्यटनाकरिता मालदीवऐवजी लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांकडे वळावे. श्रीलंका, मॉरिशस, बाली इत्यादी हिंद महासागर क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे.

‘बॉयकॉट मालदीव’ मोहिमेला आमचा पाठिंबा – देवेंद्र गंद्रे 
देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम महत्त्वाचं आहे. त्यामुळे मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा निषेध करत आहे तसेच बॉयकॉट मालदीव या मोहिमेला आमचा पाठिंबा आहे. देशभक्त भारतीय म्हणून नागरिकांनी पर्यटनाकरिता मालदीवऐवजी लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार या स्थळांचाही विचार करावा. व्यापक राष्ट्रहितासाठी हे महत्त्वाचे आहे, असे मत हिमश्री ट्रेक अँण्ड टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर देवेंद्र गंद्रे यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.