विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश बुधवारी (10 जानेवारी ) दिला त्यानंतर आता तरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते. त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आपल्या निर्णयात हे सरकार बरखास्त करण्याचा आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.
(हेही वाचा – Uddhav Thackeray : राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर उबाठाची कशी झाली कोंडी?)
ते पुढे म्हणाले की, काही लोकं मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community