NCP : शिवसेना निकालामुळे अजित पवारांचा मार्ग सुकर?

223
  • सुजित महामुलकर

आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला. या ऐतिहासिक निकालाचे संदर्भ आणि त्याचे पडसाद यापुढील काळात अन्य प्रकरणांमध्ये लागू झाल्यास आश्चर्य वाटू नये. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचीदेखील (NCP) दोन शकले झाली असून आजच्या निकालावरून राष्ट्रवादीमधील अजित पवार गटाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

३१ जानेवारीपर्यंत सुनावणी संपवणार

शिवसेनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) आमदार अपात्रतेची सुनावणी गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र,  नार्वेकर यांची तब्बेत बरी नसल्याने त्यावेळी सुनावणी रद्द करण्यात आली आणि नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत ही सुनावणी संपवणार असल्याचे समजते.

(हेही वाचा Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार; काय म्हणाले शरद पवार?)

शिवसेनेचा अनुभव गाठीशी

शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरण हे पहिलेच असल्याने दोन्ही गटाच्या आमदारांच्या सुनावणीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला. तर आता शिवसेनेचा अनुभव गाठीशी असल्याने राष्ट्रवादीच्या (NCP) सुनावणीला कमी वेळ लागणार आहे.

शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादीचे ‘भविष्य’

शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) या दोन्ही पक्षांच्या फुटीचे प्रकरण जवळपास सारखेच असल्याने शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादीचे ‘भविष्य’ अवलंबून असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. ज्याप्रमाणे बहुमतांच्या जोरावर शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला गेला तोच नियम राष्ट्रवादीला लागू झाल्यास अजित पवार यांना त्याचा फायदा होईल, असे बोलले जाते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.