Ind vs Afg 1st T20 Preview : अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये विराट खेळणार नाही, रोहितवर असेल सगळ्यांचं लक्ष

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय खेळाडूंना संघ म्हणून एकत्र येण्याच्या कमी संधी मिळणार आहेत. जितक्या मिळतील तितक्या वापरा, असा सल्ला प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिला आहे. 

276
Ind vs Afg 1st T20 Preview : अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये विराट खेळणार नाही, रोहितवर असेल सगळ्यांचं लक्ष
Ind vs Afg 1st T20 Preview : अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये विराट खेळणार नाही, रोहितवर असेल सगळ्यांचं लक्ष
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ज्येष्ठ खेळाडू १४ महिन्यांनंतर भारतीय संघात परतले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध सगळ्याचं लक्ष असेल ते या दोघांवरच. टी-२० क्रिकेटशी दोघं पुन्हा एकदा कसं जुळवून घेतात आणि ते किती प्रभावी ठरतात, हाच चर्चेचा विषय असेल. पैकी विराट मोहालीला होणार पहिला टी-२० सामना घरगुती कारणामुळे खेळणार नाहीए. त्यामुळे गुरुवारी (११ जानेवारी) सगळ्यांचं लक्ष रोहितवर असेल. (Ind vs Afg 1st T20 Preview)

भारतीय फलंदाजी बऱ्यापैकी जमून आली आहे. ऋतुराज दुखापतीमुळे या संघात नाहीए. पण, रोहित असल्यामुळे यशस्वी जयसवाल आणि रोहित ही सलामीची जोडी निश्चित आहे. तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. विराट नसल्यामुळे तिलक वर्माला पुन्हा संधी मिळू शकते. रिंकू सिंगने टी-२० प्रकारात संघातील आपली जागा भक्कम केली आहे. तर शिवम दुबेला अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्की संधी मिळू शकते. (Ind vs Afg 1st T20 Preview)

(हेही वाचा – MLA Disqualificaton Case : आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटांच्या याचिका फेटाळल्या; दोन्ही गटांचे आमदार पात्र)

ईशान किशनला आश्चर्यकाररीत्या वगळण्यात आलंय. आणि जितेन शर्मा आणि संजू सॅमसन यांना संधी मिळालीय. आणि यातील जितेन मोहालीत खेळण्याची शक्यता जास्त आहे. (Ind vs Afg 1st T20 Preview)

भारतीय संघासमोर आव्हान आहे ते गोलंदाजीचंच. अर्शदीप आणि मुकेश यांनी चांगली कामगिरी केलीय. आवेश खानही संघात जागा मिळवण्याच्या स्पर्धेत असेल. पण, यातल्या एकानेही संघात आपली जागा अजून पक्की केलेली नाही. जसप्रीत आणि सिराजच्या बरोबरीने एक तेज गोलंदाजीची जागा संघात नक्की रिकामी आहे. त्या जागेसाठी या तिघांमध्ये चुरस असेल. तर कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांचा समावेश जवळ जवळ नक्की आहे. (Ind vs Afg 1st T20 Preview)

(हेही वाचा – ‘Satyashodhak’ला राज्य जीएसटी सवलत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

भारतीय संघाला टी-२० विश्वचषकापूर्वी राष्ट्रीय संघ म्हणून एकत्र येण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे या संधीकडे सकारात्मकरित्या पाहा, असा सल्ला प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ या मालिकेत आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करेल. पण, मुख्य फिरकी गोलंदाज रशिद खानच्या अनुपस्थितीमुळे त्यांना नक्की फरक पडेल. (Ind vs Afg 1st T20 Preview)

अफगाणिस्तानने अलीकडे विश्वचषकात जायंट कीलर असा लौकीक मिळवला आहे. आणि संघातील घणाघाती फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांची संख्या पाहता टी-२० हा प्रकारच त्यांना जास्त आवडतो. आताही त्यांच्यासमोर तगड्या भारतीय संघाला हरवण्याचं नवं आव्हान असेल. आणि रशिद खान नसला तरी नवीन उल हक, मुजिब झरदान आणि फझलहक फारुकी यांच्यामुळे गोलंदाजीतही हा संघ पुरेसा ताकदवान आहे. त्यामुळे भारतासाठी ही लढत विजयासाठी आसुसलेल्या अफगाणिस्तान संघाशी असेल हे नक्की. (Ind vs Afg 1st T20 Preview)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.