Mahadev Betting App : प्रवर्तक रवी उप्पलच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी; ईडीच्या कारवाईला यश

गेल्या ३२ दिवसांपासून दुबईच्या तुरुंगात असलेल्या महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला भारतात आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश अजय सिंग राजपूत यांनी उप्पलच्या प्रत्यार्पणाची ईडीची याचिका मंजूर केली. ईडी आता उप्पलशी संबंधित कागदपत्रे भारतीय दूतावासात पाठवण्याची तयारी करत आहे.

286
Mahadev Betting App चे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह ७० जणांना अटक

महादेव ॲप प्रकरण (Mahadev Betting App) हा ऑनलाइन बेटिंग (Online betting) प्लॅटफॉर्मचा समावेश असलेला हाय-प्रोफाइल घोटाळा आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे पोकर, पत्ते खेळ, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळण्याची संधी मिळते.

रवी उप्पलला भारतात आणण्याची परवानगी –

काही दिवसांपूर्वी महादेव ॲपचा (Mahadev Betting App) विषय विधानसभेतही झाला होता. त्या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या २ महिन्यांत यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या ३२ दिवसांपासून दुबईच्या तुरुंगात असलेल्या महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला भारतात आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश अजय सिंग राजपूत यांनी प्रत्यार्पणाची ईडीची याचिका मंजूर केली आहे.

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तीन तास राहणार बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कसे असेल नियोजन; वाचा सविस्तर)

संबंधित कागदपत्रे भारतीय दूतावासात पाठवण्याची तयारी –

ईडी आता उप्पलशी संबंधित कागदपत्रे भारतीय दूतावासात पाठवण्याची तयारी करत आहे. ईडीचे विशेष सरकारी वकील डॉ. सौरभ कुमार पांडे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या विशेष न्यायालयाने दुबईतील सक्षम न्यायालयाला प्रत्यार्पणाचा भाग म्हणून उप्पल याला भारतात आणण्यासाठी विनंती पत्र जारी केले आहे. (Mahadev Betting App)

६० दिवसांच्या आत प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण –

नियमांनुसार, भारतीय दूतावासाला दुबईच्या न्यायालयाकडून (Mahadev Betting App) परवानगी मिळाल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार आहे. तसेच ईडीला या घोटाळ्यात सामील असलेल्या आणखी काही लोकांची नावे मिळाल्याची चर्चा आहे, ज्यांना लवकरच अटक केली जाऊ शकते. विशेष न्यायाधीशांनी १६ जानेवारीपर्यंत चौकशीची परवानगी दिली आहे. (Mahadev Betting App)

(हेही वाचा – Cold Weather Update : राज्याला हुडहुडी भरणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट)

अनेक ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ –

ईडीच्या या कारवाईनंतर राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या (Mahadev Betting App) अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. छत्तीसगडसह देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीच्या या मोठ्या घोटाळ्यात रवी उप्पल यांच्याकडून पैसे कधी आणि कसे हस्तांतरित केले गेले याची माहिती ईडीला मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळेच या प्रकरणाशी संबंधित अनेक ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या अडचणीही वाढू शकतात. (Mahadev Betting App)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.