Kailash Satyarthi: ‘ह्युमेनीटेरियन’ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय

263
Kailash Satyarthi: 'ह्युमेनीटेरियन' पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय
Kailash Satyarthi: 'ह्युमेनीटेरियन' पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय

कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) एक समाजसेवक आणि समाजसुधारक आहेत. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५४ रोजी मध्य प्रदेश येथे झाला. ते लहान मुलांच्या हक्कासंदर्भात कार्य करतात. त्याचबरोबर बाल-श्रमाच्या विरोधात जनजागृती करतात. १९८० मध्ये त्यांनी ‘बचपन बचाओ आंदोलना’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी जगभरातील १४४ देशांमधून ८३,००० पेक्षा अधिक लहान मुलांच्या रक्षणासाठी कार्य केले आहे.

ते व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, पण त्यांना सामाजिक कार्याला ओढ होती आणि म्हणून वयाच्या २६व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडली आणि ते लहान मुलांसाठी समर्पित होऊन कार्य करू लागले. ते सध्या ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर’चे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी सेम्टर फॉर व्हिक्टिम्स ऑफ टॉर्चर, इंटरनॅशनल लेबर राइट्स फंड, कोकोआ इनिशिएटिव्ह इत्यादींमध्ये बोर्ड आणि कमिटी मेंबर म्हणून काम पाहिले आहे.

(हेही वाचा – Mahadev Betting App : प्रवर्तक रवी उप्पलच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी; ईडीच्या कारवाईला यश )

२०१५ मध्ये फोर्च्युन मॅगझिनने ‘जागतिक सर्वोत्कृष्ट नेतृत्व’ म्हटले होते आणि त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांची भारत यात्रादेखील चर्चेत होती. त्यांनी सुमारे १९,००० किमी एवढा प्रवास ३५ दिवसांत केला. त्याचं कारण होतं लहान मुलांवरी लैंगिक अत्याचाराविरोधात कायदे करणे. ते आजही लहान मुलांच्या कल्याणासाठी काम करत आहेत.

कैलाश सत्यार्थी यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. २०१४ मध्ये त्यांना नोबेल शांती पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर १९९३मध्ये अमेरिकेत अशोक फेलो म्हणून त्यांची निवड झाली. १९९५ मध्ये अमेरिकेतला ट्रम्पेटर पुरस्कार प्राप्त झाला. नेदरलॅंडचा गोल्डेन फ्लॅग पुरस्कार १९९८ मध्ये मिळाला तसेच ह्युमेनीटेरियन हा पुरस्कार त्यांना २०१५ मध्ये प्राप्त झाला. विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.