राहुल द्रविड (Rahul Dravid) हे नाव क्रिकेट रसिकांना निश्चितच माहित आहे. अधिक कालावधीसाठी फलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे त्याला ’द वॉल’ म्हटले जाते. द्रविडने अनेक विक्रम केले आहेत. द्रविड एक अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू. ऑक्टोबर २००५ मध्ये तो भारताचा कर्णधार झाला आणि सप्टेंबर २००७ मध्ये त्याने कर्णधारपद सोडून दिले.
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तीन तास राहणार बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कसे असेल नियोजन; वाचा सविस्तर)
राहुल द्रविड सुमारे १६ वर्षे भारतासाठी खेळला –
राहुल द्रविड (Rahul Dravid) सुमारे १६ वर्षे भारतासाठी खेळला आणि त्याने स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. द्रविड हा अतिशय धीम्या गतीने खेळणारा एक अष्टपैलू खेळाडू होता. सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करतोय. राहुल द्रविडचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी इंदौर येथे एका मराठी कुटुंबात झाला. मात्र जन्म मध्य प्रदेशात आणि पालनपोषण बंगळुरु येथे झाले.
(हेही वाचा – Cold Weather Update : राज्याला हुडहुडी भरणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट)
प्लेअर ऑफ द इयर’ आणि ‘टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार प्राप्त –
वयाच्या १२ व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि नंतर कर्नाटकचे (Rahul Dravid) प्रतिनिधित्व अंडर -१५, अंडर -१७ आणि १९ मध्ये केले. २००० मध्ये Wisden Cricketers’ Almanack द्वारे त्या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट पाच क्रिकेटपटूंपैकी एक क्रिकेटर म्हणून त्याची निवड झाली आणि २००४ मध्ये आयसीसी पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात त्याला ‘प्लेअर ऑफ द इयर’ आणि ‘टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार प्राप्त झाला.
509 intl. matches 👏
24,208 intl. runs 👌
4⃣8⃣ intl. hundreds 💯Here’s wishing Rahul Dravid – Former #TeamIndia Captain and present Head Coach of India (Men’s team) – a very Happy Birthday 🎂👏 pic.twitter.com/6yuh9aL5my
— BCCI (@BCCI) January 11, 2024
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा –
जानेवारी २०२२ पर्यंत राहुल द्रविड (Rahul Dravid) हा सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग आणि जॅक कॅलिस नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होता. २००४ मध्ये चित्तगॉंगमध्ये बांगलादेश विरुद्ध शतक ठोकून तो सर्व दहा टेस्ट-खेळणार्या देशांमध्ये पहिला खेळाडू ठरला.
(हेही वाचा – Kailash Satyarthi: ‘ह्युमेनीटेरियन’ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय)
प्रद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित –
एकूण २८६ कसोटी सामने तो (Rahul Dravid) खेळला आहे. त्यामध्ये ३१,२५८ बॉल्सचा सामना त्याने केला आहे आणि ४४,१५२ मिनिटे त्याने क्रीजवर घालवले आहेत. हा एक अनोखा रेकॉर्ड म्हणावा लागेल. त्याच्या क्रिकेटमधील योगदानासाठी त्याला प्रद्मश्री आणि पद्मभूषण (Rahul Dravid) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये तो निवृत्त झाला. मात्र त्याने क्रिकेटला बरेच काही दिले आहे आणि आजही तो देत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community