India T20 Team : इशान, श्रेयसला का वगळलं? द्रविड यांनी सांगितलं ‘खरं’ कारण

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून अफगाणिस्तान विरुद्धच्या संघातून वगळल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली होती

271
India T20 Team : इशान, श्रेयसला का वगळलं? द्रविड यांनी सांगितलं ‘खरं’ कारण

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धची टी-२० मालिका गुरुवारपासून (११ जानेवारी) सुरू होतेय. पण, मालिकेसाठी निवडलेल्या (India T20 Team) भारतीय संघात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना स्थान मिळालं नाही. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाल्याची बातमी आनंदबझार पत्रिका या बंगाली वृत्तपत्राने दिली होती. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही बातमी पत्रकार परिषदेत फेटाळून लावली. आणि दोघांना वगळण्याचं खरं कारणही सांगितलं.

इशान किशनने बीसीसीआयला फसवले ?

इशान किशन (India T20 Team) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून एकदिवसीय मालिकेनंतर भारतात परतला होता. त्याने मानसिक थकव्याचं कारण देत बीसीसीआयकडून तशी परवानगीच मागितली होती. पण, त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणीबरोबर तो दुबईत मजा करताना दिसला. त्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर नाराज असल्याची बातमी एबीपीने दिली होती.

(हेही वाचा – Rajnath Singh: राजनाथ सिंह ३ दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर, दोन्ही देशांच्या संरक्षणाबाबत महत्त्वाची चर्चा)

श्रेयसचा बीसीसीआयकडे विश्रांतीचा अर्ज –

तर श्रेयस अय्यरच्या बाबतीत त्याने रणजी सामना खेळायला नकार दिला, असं त्यांनी बातमीत म्हटलं होतं. दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या कामगिरीवर निवड समिती नाराज होती. त्यामुळे अध्यक्ष अजित आगरकर यांनी श्रेयसला भारतात परतल्यावर मुंबईकडून रणजी करंडकाचा सामना खेळायला सांगितलं. पण, श्रेयसने त्या ऐवजी बीसीसीआयकडे विश्रांतीचा अर्ज केला. आणि त्यामुळे वैतागून त्याला अफगाणिस्तान विरुद्ध निवडण्यात आलं नाही, असं एबीपीने आपल्या बातमीत म्हटलं होतं. (India T20 Team)

(हेही वाचा – Mahadev Betting App : प्रवर्तक रवी उप्पलच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी; ईडीच्या कारवाईला यश)

खरंतर श्रेयस त्यानंतर आंध्रप्रदेश विरुद्ध रणजी सामना खेळणारही आहे. त्याचा मुंबई रणजी संघात समावेश करण्यात आला आहे.

श्रेयसची यावेळी बस चुकली – राहुल द्रविड

अशातच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत या बातम्या फेटाळून लावल्या. ‘श्रेयसची यावेळी बस चुकली, इतकंच मी म्हणेन. १६ जणांच्या संघात अनेक दावेदार फलंदाज होते. त्यात श्रेयसला यंदा जागा मिळू शकलेली नाही. पण, त्याच्यावर कारवाई अजिबात झालेली नाही. आणि पुढे त्याची निवड होऊ शकते,’ असं द्रविड यांनी स्पष्ट केलं. (India T20 Team)

(हेही वाचा – Rahul Dravid : द वॉल : भारतीय संघाची मजबूत भिंत)

इशान किशन मानसिक थकव्यामुळे संघाबाहेर –

तर इशान किशनलाही वगळलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. ‘इशान किशन मानसिक थकव्यामुळे संघाबाहेर आहे. त्याने तसं बीसीसीआयला कळवलंय. आणि जेव्हा तो निवडीसाठी उपलब्ध असेल तेव्हा पर्याय म्हणून त्याचा नक्की विचार होईल,’ असं द्रविड म्हणाले. श्रेयसची आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील कामगिरी चिंताजनक होती. तर इशान किशनला मागच्या काही महिन्यात फारशी संधी मिळू शकलेली नाही. (India T20 Team)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.