अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा (Ram Mandir) अविस्मरणीय करता यावा यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे. येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या औपचारिक कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी (११ जानेवारी) पासून अयोध्येत राम लल्ला मंदिराच्या आवारात यजुर्वेदाचे पठणाला सुरुवात झाली आहे. यजुर्वेद पठणाचा हा कार्यक्रम पुढील चार दिवस सुरू राहणार आहे. पठणासाठी 121 वेदपतींना बोलावण्यात आले आहे, जे सातत्याने यजुर्वेदाचे पठण करतील. यासाठी दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा- India T20 Team : इशान, श्रेयसला का वगळलं? द्रविड यांनी सांगितलं ‘खरं’ कारण)
यजुर्वेदाच्या पठणाबाबत असा विश्वास आहे की, जेव्हा कोणतेही वैदिक कार्य कोणत्याही ठिकाणी सुरू होते, तेव्हा त्यापूर्वी असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी यजुर्वेदाचे पठण केले जात आहे.
२२ जानेवारीला भजन संध्या कार्यक्रमांचं आयोजन…
१४ जानेवारीपासून अयोध्येत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. २२ जानेवारीला भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. त्यात अनुप जलोटा, ऋचा शर्मा, तृप्ती शाक्य असे अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. अयोध्येत नव्याने उद्घाटन झालेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महर्षी वाल्मिकींचा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे.
हेही पहा –