हेन्ली आणि भागीदार (Henley and partners) या पासपोर्ट रँकिंग संस्थेने २०२४ साठी पासपोर्ट निर्देशांक जारी केला आहे. हे रँकिंग इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA)च्या माहितीवर आधारित आहे. या पासपोर्ट रँकिंग यादीत भारत ८० व्या स्थानावर आहे.
६२ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास…
पासपोर्ट रँकिंग संस्थेच्या म्हणण्यानुसार, जगातील जपान, सिंगापूर, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी या ६ देशात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. २०२३मध्येही भारत ८०व्या स्थानावर होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यांदा भारतीयांना आणखी ५ देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करता येणार आहे. २०२३ मध्ये भारतीय ५७ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकत होते, तर यावर्षी हा आकडा ६२ वर पोहोचला आहे.
पहिल्या ५ स्थानांवर युरोपीय देशांचे वर्चस्व
पासपोर्ट क्रमवारीत पहिल्या ५ स्थानांवर युरोपीय देशांचे वर्चस्व आहे. यामध्ये फिनलंड, स्वीडन आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानावर आहेत. ज्यांचे नागरिक व्हिसा न घेता १९३ देशांमध्ये जाऊ शकतात, तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँडच्या पासपोर्टला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
(हेही वाचा – Liquor Policy Scam Case : खासदार संजय सिंह आणि सिसोदियांच्या कोठडीत वाढ )
पाकिस्तानींचा केवळ ३४ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास…
पाकिस्तानचा जगातील चौथ्या क्रमांकााच कमकुवत पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टची क्रमवारी १०१ आहे. येथील नागरिक ३४ देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवास करू शकतात. जवळपास २ वर्षांपासून युद्ध सुरू असतानाही युक्रेनचा पासपोर्ट भारताच्या पासपोर्टपेक्षा जास्त ताकदवान आहे, पण रशियाच्या पासपोर्टपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. हेन्ली अँण्ड पार्टनर्सच्या क्रमवारीत युक्रेनचा पासपोर्ट ३२व्या क्रमांकावर आहे. येथील नागरिक १४८ देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करू शकतात, तर रशियन पासपोर्टची क्रमवारी ५१ आहे. रशियन नागरिक व्हिसाशिवाय ११९ देशांना भेटू शकतात तसेच ३ महिन्यांपासून हमासशी युद्ध करणाऱ्या इस्रायलच्या पासपोर्टची क्रमवारी २१ आहे.
पासपोर्टची क्रमवारी कशी ठरवतात?
पासपोर्टची क्रमवारी वर्षातून दोनदा जाहीर केली जाते. जानेवारीमध्ये पहिल्यांदा आणि जुलै महिन्यात दुसऱ्यांदा निर्देशांक जाहीर केले जातात. हेन्ली पासपोर्ट व्हिसा इंडेक्स वेबसाईटनुसार, रिअल टाइम डेटा वर्षभर अपडेट केला जातो. व्हिसा धोरणातील बदलही विचारात घेऊन एखाद्या देशाचा पासपोर्टधारक पूर्व व्हिसा न घेता किती देशांमध्ये प्रवास करू शकतो. या आधारावर क्रमवारी ठरवली जाते.
हेही पहा –