Share Market: अदानी समुहाची नवीन कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध, लवकरच आयपीओ बाजारात येणार, वाचा सविस्तर…

अदानी समूह विमानतळ व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत आहे.

316

गेल्या काही वर्षात लक्षणीय परतावा देणाऱ्या अदानी समुहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ (IPO) लवकरच बाजारात येणार आहे. त्यामुळे IPO द्वारे कमाई करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे. आता अदानी समूह विमानतळ व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत आहे. याआधी उद्योगपती गौतम अदानींच्या अध्यक्षतेखाली अदानी समुहाच्या १० कंपन्या भारतीय शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध आहेत. अदानी समुहाच्या विमानतळ व्यवसायाचे प्रमुख जीत अदानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

याबाबत जीत अदानी यांनी सांगितले की, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची विमानतळ व्यवसाय शाखा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड भविष्यात स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होईल. ते पुढे म्हणाले की, हे काही ट्रिगर्सवर अवलंबून असेल. तथापि, आम्हाला अजूनही काही ट्रिगर्सवर मात करायची असून कंपनी सूचीबद्ध करण्यापूर्वी अदानी एंटरप्रायझेसमधून डिमर्ज केले जाईल.

(हेही वाचा – Asian Shooting Qualifiers : भारताच्या नॅन्सी आणि इलावेनिल यांना एअर रायफल प्रकारात सुवर्ण व रौप्य  )

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तब्बल ८ कोटी लोकांनी या विमानतळांवरून प्रवास केला. अशा परिस्थितीत या आकडेवारीत विक्रमी वाढ दिसून आली, जी प्री-कोविड प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. विमानतळ व्यवसायात लक्षणीय वाढ होत आहे. अदानी विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करत आहे, ज्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय कंपनी अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळांची देखरेख करते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.