Waste Water Treatment Plant : प्रक्रिया केलेले सांडपाणी पिण्यायोग्य; यासाठी असा बनवला जात आहे आराखडा

मुंबईतील सात मलजल प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर भांडुप संकुलात स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्र बांधून शुध्दीकरण केले जाणार आहे. यासाठी या सातही सांडपाणी केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी विहार तलावातून भांडुप संकुलात वाहून नेणाऱ्या जल वितरण प्रणालीतून आणले जाणार आहे.

1996
Waste Water Treatment Plant : प्रक्रिया केलेले सांडपाणी पिण्यायोग्य; यासाठी असा बनवला जात आहे आराखडा
Waste Water Treatment Plant : प्रक्रिया केलेले सांडपाणी पिण्यायोग्य; यासाठी असा बनवला जात आहे आराखडा
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईतील सात मलजल प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर भांडुप संकुलात स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्र बांधून शुध्दीकरण केले जाणार आहे. यासाठी या सातही सांडपाणी केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी विहार तलावातून भांडुप संकुलात वाहून नेणाऱ्या जल वितरण प्रणालीतून आणले जाणार आहे. त्यामुळे सातही मल जल प्रक्रिया केंद्रातील पाणी आता भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केंद्रातून थेट मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचवले जाईल अशाप्रकारचा आराखडा महापालिकेच्यावतीने बनवला जात आहे. याचा अहवाल बनवण्याचे काम हाती घेतलेे जात आहे. (Waste Water Treatment Plant)

मुंबईला दरदिवशी सध्या ३८३० दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जात असून मुंबईकरांची दिवसांची तहान ही ४५०० दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यामुळे सध्या सुमारे ६७० दशलक्ष एवढी पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे एकूण पाणी पुरवठ्यातील ही तूट भविष्यात भरुन काढण्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच मुंबईतील सांडपाणी प्रकल्पातील अर्थात मल जल प्रक्रिया केंद्रातील शुध्द केलेल्या पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुसाध्यता अहवाल बनवला जात आहे. त्यामुळे मल जल प्रक्रिया केलेल्या पाण्यावर पुन्हा शुध्दीकरण करून त्या पाण्याचा वापर पिण्यायोग्य करण्यासाठी विविध कंपन्यांकडून स्वारस्य अर्जही मागवले जात आहेत. त्यादृष्टीकोनातून निविदा मागवली जाणार आहे. (Waste Water Treatment Plant)

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प अंतर्गत सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र अर्थात वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लांट उभारुन सांडपाण्याचे तृतीय स्तरापर्यंत प्रक्रिया केलेल्या पाण्यात रुपात करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या मलजल प्रक्रिया केंद्रामधून उत्पादित पाण्याचे पुढे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतरीत झाल्यावर त्याचे महापालिकेच्या सेवा जलाशयांमध्ये एकत्रिकरण करण्यासाठी विविध स्तरावार चाचपणी सुरू आहे. मल जल प्रक्रिया केंद्रातून उत्पादित पाणी हे पिण्यायोग्य पाणी भांडुप संकुलात शुध्दीकरण करण्यासाठी जाणाऱ्या विहार तलावाच्या पाण्यात जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल. विहार तलावामध्ये साठवण्यासाठी तथा विहार तलावाच्या पाण्यामध्ये समायोजनेसाठीचे उत्पादित पिण्यायोग्य पाण्याची क्षमता पाहून भांडुप संकुलामध्ये नवीन जल प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन आणि पाण्याची साठवणूक करण्यासाठीचे बांधकाम केले जाईल, याचा आराखडा बनवला जात असल्याचे बोलले जात आहे. (Waste Water Treatment Plant)

(हेही वाचा – MTHL : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्गाची पोलिसांकडून वाटाघाटी; १२ जानेवारीला होणार उद्घाटन)

भांडुप मलजल प्रक्रिया केंद्र :
प्रतिदिन क्षमता : २१५दशलक्ष लीटर
धारावी मलजल प्रक्रिया केंद्र : 
प्रतिदिन क्षमता : ४१८ दशलक्ष लीटर
वरळी मलजल प्रक्रिया केंद्र :

प्रतिदिन क्षमता : ५०० दशलक्ष लीटर

मालाड मलजल प्रक्रिया केंद्र :

प्रतिदिन क्षमता : ४५४ दशलक्ष लीटर

घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्र :

प्रतिदिन क्षमता : ३३७ दशलक्ष लीटर

वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्र :

प्रतिदिन क्षमता : ३२५ दशलक्ष लीटर

वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्र : 

प्रतिदिन क्षमता : १८० दशलक्ष लीटर (Waste Water Treatment Plant)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.