Doping in India : २०२२-२३ मध्ये १४२ भारतीय ॲथलीट उत्तेजक चाचणीत आढळले दोषी 

नाडाचा हा ताजा अहवाल अनेक अर्थांनी धक्कादायक आहे. 

186
Doping in India : २०२२-२३ मध्ये १४२ भारतीय ॲथलीट उत्तेजक चाचणीत आढळले दोषी 
Doping in India : २०२२-२३ मध्ये १४२ भारतीय ॲथलीट उत्तेजक चाचणीत आढळले दोषी 
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संघटना अर्थात नाडाने (NADA) २०२२-२३ साठीचा आपला उत्तेजक चाचणी अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला आहे. आणि त्यानुसार देशातील १४२ ॲथलीटनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत उत्तेजक द्रव्य घेतल्याचं सिद्ध झालं आहे. या कालावधीत २७ क्रिकेटपटूंचीही उत्तेजक द्रव्य चाचणी झाली. आणि यातील १३ जणांनी वैद्यकीय उपचार म्हणून काही उत्तेजक द्रव्य घेतल्याचं मान्य केलं होतं. (Doping in India)

सुर्यकुमार यादव, स्मृची मंढाना, रवी जाडेजा, हरमनप्रीत कौर, हार्दिक पांड्या, ईशान किशन, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची माहिती नाडाकडे (NADA) नोंदणीकृत आहे. या सर्वांनी उपचारांदरम्यान प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य असलेली काही औषधं घेतली आहेत. पण, अर्थात तेव्हा ते खेळत नव्हते. (Doping in India)

बाकी उत्तेजक चाचणी अहवाल चांगलाच विदारक आहे. गेल्यावर्षी नाडाने (NADA) ४,३४२ ॲथलीटची उत्तेजक द्रव्य चाचणी घेतली. आणि यात १४२ खेळाडू दोषी आढळले. यातल्या ८० ॲथलीटवर कारवाई करण्यात आली. (Doping in India)

(हेही वाचा – MTHL : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्गाची पोलिसांकडून वाटाघाटी; १२ जानेवारीला होणार उद्घाटन)

ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात सर्वाधिक म्हणजे ४९ उत्तेजक सेवनाच्या घटनांची नोंद झाली. तर पाठोपाठ भारोत्तोलन (२२), कुस्ती (१७) आणि पॉवरलिफ्टिंग (१३) या खेळात दोषी ॲथलीट आढळले आहेत. (Doping in India)

यंदाचं वर्ष ऑलिम्पिक वर्ष आहे. त्यामुळे नाडाने पाश आणखी आवळले असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची पुरेपूर शक्यता असलेले खेळाडू नाडाने (NADA) वेगळे केले आहेत. ऑलिम्पिक पूर्वी अशा खेळाडूंच्या किमान तीन उत्तेजक द्रव्य चाचण्या करण्याचा नाडाचा (NADA) मानस आहे. खासकरून हॉकी, मुष्टीयुद्ध, नेमबाजी, बॅडमिंटन, तिरंदाजी, भारोत्तोलन आणि टेनिस या खेळातील खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. (Doping in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.