केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण २०२३चा (Clean Survey 2023) निकाल जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रात नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असून पुणे पुन्हा टॉप टेनमध्ये पुनरागमन करत आहे. १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांची क्रमवारी नुकतीच जाहीर झाली.
इंदूरने सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला, तर सुरत पहिल्यांदाच अव्वल क्रमांकासाठी संयुक्त विजेता ठरले, ‘हिऱ्यांचे शहर’, अशी ओळख असलेले गुजरातमधील सुरत २०२० पासून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून नवी मुंबईने तिसरा क्रमांक राखला आहे, पुण्याने पुन्हा टॉप टेनमध्ये पुनरागमन केले आहे.
(हेही वाचा – MTHL : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्गाची पोलिसांकडून वाटाघाटी; १२ जानेवारीला होणार उद्घाटन)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या २०२३च्या स्वच्छ शहर निकालानुसार, महाराष्ट्रातील सासवडला १ लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. छत्तीसगडमधील पाटण आणि लोणावळा या शहरांनी या यादीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये सर्वात स्वच्छ ठरली आहेत.
हेही पहा –