MD Seized : वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण निघाला नशेचा सौदागर; १ कोटी १७ लाखांचा एमडी जप्त

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने डार्क नेट आणि इतर वेबसाईटचा आधार घेऊन एमडी हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना कांदिवली चारकोप येथील एका चाळीत उघडल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे.

373
MD Seized : वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण निघाला नशेचा सौदागर; १ कोटी १७ लाखांचा एमडी जप्त
MD Seized : वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण निघाला नशेचा सौदागर; १ कोटी १७ लाखांचा एमडी जप्त
संतोष वाघ,मुंबई

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने डार्क नेट आणि इतर वेबसाईटचा आधार घेऊन एमडी (MD) हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना कांदिवली चारकोप येथील एका चाळीत उघडल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पथकाचे सपोनि. निलेश साळुंखे यांच्या पथकाने या चाळीत छापा टाकून या तरुणाला १ कोटी १७ लाख रुपयांच्या एमडी (MD) आणि तयार करण्यासाठी लागणारे साहित्यासह अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने एमडी (MD) तयार करण्याचा फर्म्युला आणि बनविण्याची पध्द्त याची माहिती असणारे एक पुस्तक छापले असून पोलिसाना छाप्यात हे पुस्तक देखील मिळून आले आहे. (MD Seized)

नूर आलम मेहबूब शेख आलम चौधरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नूर आलम याचे बारावी पर्यत शिक्षण झाले असून त्याने बी. एच. एम. एस या वैद्यकीय क्षेत्रात नुकताच प्रवेश घेतला आहे. कांदिवली पश्चिम संघवी इस्टेट, इस्लाम कपाउंड येथे कुटुंबासोबत राहणारा नूर आलम हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण आहे. वडील टॅक्सी चालक असून आई गृहिणी आहेत. नूर ला दोन भांवड असून नूर सर्वात मोठा आहे अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वपोनि. चिमाजी आढाव यांनी दिली. (MD Seized)

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारी रोजी मालवणी पोलीस ठाण्याचे गुंडा पथकाचे सपोनि. निलेश साळुंखे यांच्या पथकाने अबरार याला १ ग्राम एमडी (MD) आणि १०० थिनरच्या बॉटल सह अटक केली होती. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने नूर आलम याच्याकडून एमडी विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश साळुंखे यांनी आपल्या पथकासह सापळा रचून कांदिवली संघवी इस्टेट, इस्लाम कपाउंड येथून नूर आलम याला ९ जानेवारी रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. (MD Seized)

नूर आलम हा स्वतः एका खोलीत एमडी (MD) बनवत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी तात्काळ नूर ज्या ठिकाणी एमडी तयार करीत होता त्या ठिकाणी छापा टाकला असता एका १० बाय १० च्या खोलीत पोलिसांना एमडी तयार करण्याचे साहित्य, कच्चा माल आणि तयार करण्यात आलेले ५०० ग्राम शुद्ध एमडी (Mephedrone) हा अमली पदार्थ मिळून आला, तसेच पोलिसांनी त्या खोलीतून एक पुस्तक मिळून आले, या पुस्तकात एमडीचा (MD) फार्म्युला आणि तयार करण्याची पद्धत देण्यात आली होती. मालवणी पोलीस पथकाने नूर आलम याच्या भाड्याच्या घरातून हे सर्व साहित्य आणि ५००ग्राम एमडी जप्त केले असून जप्त करण्यात आलेल्या सर्व सामुग्रीची किंमत १ कोटी १७ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती वपोनि. चिमाजी आढाव यांनी दिली. (MD Seized)

(हेही वाचा – Sudhanshu Trivedi : ‘कारसेवकांवर गोळीबार करणारे देखील येत आहेत, पण … – भाजपची काँग्रेसवर टीका)

नूर असा बनला नशेचा सौदागर…

नूरला रसायनशास्त्रची खूप आवड असून इंटरनेटवर तो रसायनशास्त्र संबंधी शोध घ्यायचा. इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर शोध घेत असताना त्याला डार्कनेट,तसेच काही आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर एमडी (MD) तयार करण्याचा फार्म्युला मिळून आला. नूर ने या वेबसाईटवरून एमडी (MD) तयार करण्याचा फार्म्युला आणि एमडी (MD) तयार करण्याची माहिती डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट काढून एक पुस्तक तयार केले. त्यांच्या आधारे तो घरीच एमडी (MD) तयार करण्याचा प्रयोग करू लागला, आणि त्यात तो यशस्वीसुद्धा झाला. त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणात एमडी तयार करून विकण्याची योजना आखली.

भाड्याने खोली घेऊन लॅब तयार केली…

नूर आलम याने कांदिवली चारकोप येथील समता वेल्फेअर सोसायटी गल्ली नंबर ८ येथे बैठ्या चाळीत एक खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी त्याने एमडी बनविण्याची लॅब तयार करून मागणी नुसार तो एमडी तयार करून विकू लागला होता, मागील पाच ते सहा महिन्यापासून नूर आलम हा मागणी नुसार एमडी (MD) तयार करून लहान मोठ्या विक्रेत्यांना विकू लागला होता अशी माहिती त्याच्या चौकशीत समोर आली असल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले. नूर याच्या संपर्कात ड्रग्स विक्रेत्या महिला आणि पुरुष आले होते, त्यांच्या मागणीनुसार नूर त्यांना एमडी (MD) बनवून पुरवठा करीत होता, पोलिसाकडून या ड्रग्स विक्रेत्या महिला आणि पुरुषाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती आढाव यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.