- ऋजुता लुकतुके
स्पाईसजेट विमान कंपनी लवकरच आपल्या सेवेचा विस्तार करणार असून जानेवारीपासूनच कंपनी अयोध्या आणि लक्षद्वीप या ठिकाणी आपली विमान सेवा सुरू करत आहे. कंपनीचे अध्यक्ष अजय सिंग (Ajay Singh) यांनी कंपनीच्या वार्षिक समभागधारकांच्या बैठकीत ही माहिती दिली. सेवेच्या विस्तारासाठी कंपनीने २,२५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (SpiceJet New Flights)
स्पाईसजेट कंपनीकडे सध्या चालू स्थितीतील ३९ विमानं आहेत. तर त्यांची २६ विमानं ही विविध कारणांमुळे जमिनीवरच आहेत. पण, आता पायाभूत सुविधांकडेही कंपनी लक्ष पुरवणार आहे. (SpiceJet New Flights)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांचा नाशिक दौरा; वाहतुकीत होणार ‘हे’ बदल)
‘लक्षद्वीप बेटांसाठी विमान सेवा सुरू करण्याचे एक्सक्लुझिव हक्कं स्पाईसजेटकडे आहेत. आणि लवकरच ही सेवा आम्ही सुरू करू,’ असं अजय सिंग (Ajay Singh) यांनी समभागधारकांना सांगितलं. ताज्या भांडवलामुळे जमिनीवर असलेली विमानं परत वापरात आणता येतील. आणि नवीन सेवाही सुरू करता येईल, असा सिंग (Ajay Singh) यांचा होरा आहे. (SpiceJet New Flights)
गेल्यावर्षी कार्लाईल एव्हिएशन्स या जागतिक कंपनीने स्पाईसजेटमधील ७ टक्के हिस्सेदारी घेतली होती. स्पाईसजेट ही प्रवासी सेवा तसंच स्पाईसएक्सप्रेस ही कार्गो सेवा अशा दोन्हीत ही कंपनी सक्रिय होती. आताही या कंपनीचा स्पाईसजेटच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचं सिंग (Ajay Singh) यांनी स्पष्ट केलं. (SpiceJet New Flights)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community