- ऋजुता लुकतुके
देशातील मध्यावर्ती निवडणुका जवळ आल्या असल्या तरी यंदाचा आयपीएल (IPL) हंगाम भारतातच घेण्याचा प्रयत्न बीसीसीआयने चालवला आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या (BCCI) वेळापत्रक थोडं छोटं करण्यात येणार आहे. म्हणजे कमी दिवसांत सर्व सामने भरवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. (IPL in India)
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की, आयपीएलचं वेळापत्रक ठरवू असं बीसीसीआयने (BCCI) यापूर्वी स्पष्ट केलं आहे. पण, बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळापत्रक बऱ्यापैकी तयार आहे. आणि आवश्यक तेवढे बदल फक्त त्यात करण्यात येणार आहेत. २२ मार्चला ही स्पर्धा सुरू होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा पूर्णपणे भारतात घेण्याचा प्रयत्न बीसीसीआय (BCCI) करणार आहे. (IPL in India)
(हेही वाचा – MD Seized : वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण निघाला नशेचा सौदागर; १ कोटी १७ लाखांचा एमडी जप्त)
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेलाच तशी माहिती दिली आहे. ‘एखाद्या शहराला त्या कालावधीत सामना आयोजित करणं शक्य झालं नाही, तर तेवढा सामना दुसरीकडे हलवला जाईल,’ असं या सूत्राने एएनआयशी बोलताना सांगितलं. (IPL in India)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम भरगच्च आहे. आणि आयपीएल (IPL) नंतर काही दिवसांतच टी-२० विश्वचषकही होणार आहे. अशावेळी फ्रँचाईज संघांनाही स्पर्धा भारतातच झालेली हवी आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की, त्यानुसार आयपीएलचं वेळापत्रक ठरवलं जाणार आहे. (IPL in India)
(हेही वाचा – Corona JN.1 update : राज्यात JN.1 व्हेरियंटचे २०० पेक्षा अधिक रुग्ण)
निवडणुकांच्या काळात पोलीस आणि इतरही सुरक्षा यंत्रणा संरक्षणाच्या कामात गुंतलेली असते. अशावेळी क्रिकेट सामन्यासाठी लागणारी सुरक्षा पुरवण्यासाठी या यंत्रणा तयार नसतात. पण, भारतात मतदान काही टप्प्यांमध्ये पार पडतं. अशावेळी जिथे मतदान नाही तिथे त्या कालावधीत सामने घेण्याची बीसीसीआयची योजना आहे. (IPL in India)
यापूर्वी २००९ मध्ये देशात निवडणुका होत्या तेव्हा बीसीसीआयला (BCCI) ही लीग दक्षिण आफ्रिकेत घ्यावी लागली होती. पण, त्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि संघाचंही आर्थिक नुकसान झालं होतं. (IPL in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community