येत्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर यंदा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) लवकर चालू होणार आहे. येत्या ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
(हेही वाचा – SpiceJet New Flights : स्पाईसजेट लवकरच अयोध्या आणि लक्षद्वीपला विमान सेवा सुरू करणार)
यंदा निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या जातील, असे सांगितले जात आहे. या अर्थसंकल्पात सरकार महिला आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठ्या घोषणा करू शकते. ३१ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. (Parliament Budget Session 2024)
(हेही वाचा – Doping in India : २०२२-२३ मध्ये १४२ भारतीय ॲथलीट उत्तेजक चाचणीत आढळले दोषी )
संसदेचे हिवाळी अधिवेशन बरेच गाजले होते. या वेळी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याचे मोठे प्रकरण घडले. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. याच अधिवेशनात विक्रमी संख्येने शेकडो सदस्यांना राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहांतून निलंबित करण्यात आले. याच अधिवेशन काळात तृणमूलच्या एका खासदाराने राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. (Parliament Budget Session 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community