Income Tax : मुंबईसह राज्यभरात प्राप्तिकर विभागाकडून 4 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी रोख रक्कम जप्त

Income Tax : मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, दमण, हालोल आणि दिल्लीतील 50 हून अधिक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान, 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर 25 हून अधिक बँक लॉकर ताब्यात घेण्यात आले आहेत.

283
Income Tax : मुंबईसह राज्यभरात प्राप्तिकर विभागाकडून 4 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी रोख रक्कम जप्त
Income Tax : मुंबईसह राज्यभरात प्राप्तिकर विभागाकडून 4 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी रोख रक्कम जप्त

22 डिसेंबर 2023 रोजी वायर, केबल आणि इतर विद्युत वस्तूंच्या उत्पादनात व्यवसायातील गटाच्या गैरव्यवहार प्रकरणी, मुंबई प्राप्तिकर विभागाने शोध आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. (Income Tax) समूहातील काही अधिकृत वितरकांनाही शोधमोहिमेत सहभागी करण्यात आले होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, दमण, हालोल आणि दिल्लीतील 50 हून अधिक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान, 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोख रक्कम (Unaccounted cash) जप्त करण्यात आली. तर 25 हून अधिक बँक लॉकर (Bank Locker) ताब्यात घेण्यात आले आहेत.

(हेही वाचा – IPL in India? आयपीएलचा हा हंगाम पूर्णपणे भारतातच घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न)

करचुकवेगिरीची कार्यपद्धती उघड

या शोध मोहिमांदरम्यान, अधिकाऱ्यांना, दस्तऐवज आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात मोठ्या संख्येने पुरावे आढळले, जे अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. या पुराव्यांवरून समूहाने काही अधिकृत वितरकांच्या संगनमताने स्वीकारलेल्या करचुकवेगिरीची (Tax evasion) कार्यपद्धती उघड झाली आहे.

400 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी विक्री

शोधमोहिमेदरम्यान सापडलेल्या विश्वासार्ह पुराव्यांवरून हे सिद्ध झाले आहे की, या प्रमुख कंपनीने सुमारे 1, 000 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख विक्री केली आहे, जी हिशोब खात्यांच्या नोंदवली गेलीच नाही. 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रोख विक्रीचे पुरावेही पथकाने जप्त आहेत. त्याशिवाय, उप करारावरचा खर्च, खरेदी आणि वाहतूक खर्च अशा स्वरूपातील किरकोळ आणि बनावट 100 कोटी रुपयांचा खर्च दाखवला असल्याचेही पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – MD Seized : वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण निघाला नशेचा सौदागर; १ कोटी १७ लाखांचा एमडी जप्त)

या शोधमोहिमेत असेही आढळले की, वितरकाने वस्तूंचा पुरवठा न करताच बिले जारी केल्याचे बनावट व्यवहारही (fraudulent transactions) केले आहेत आणि अशा सगळ्या वस्तू नंतर खुल्या बाजारात रोखीने विकल्या गेल्या आहेत. यामुळे, अधिकृत वितरकाने काही कंपन्यांना त्यांची खरेदी खाती वाढवण्याची सोय उपलब्ध करून दिली, त्याची रक्कम साधारण 500 कोटी रुपये इतकी आहे. (Income Tax)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.