Illegal Gambling : ठाण्यातील ‘द ग्रेट गॅम्बलर’ बाबू नाडारचे बेकायदेशीर जुगारांचे अड्डे उध्वस्त

गॅम्बलिंगच्या दुनियेत किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाण्यातील 'द ग्रेट गॅम्बलर' बाबू नाडार याचे ठाण्यातील जुगाराचे अड्डे ठाणे गुन्हे शाखेकडून उध्वस्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री गुन्हे शाखेच्या जवळपास १०० पेक्षा अधिक पोलिसांनी बाबू नाडारच्या कोपरी कॉलनीतील जुगाराच्या अड्ड्यांवर एकाच वेळी घाव घालून अनेकांची धरपकड केली.

262
Illegal Gambling : ठाण्यातील 'द ग्रेट गॅम्बलर' बाबू नाडारचे बेकायदेशीर जुगारांचे अड्डे उध्वस्त
Illegal Gambling : ठाण्यातील 'द ग्रेट गॅम्बलर' बाबू नाडारचे बेकायदेशीर जुगारांचे अड्डे उध्वस्त

गॅम्बलिंगच्या दुनियेत किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाण्यातील ‘द ग्रेट गॅम्बलर’ बाबू नाडार याचे ठाण्यातील जुगाराचे अड्डे ठाणे गुन्हे शाखेकडून उध्वस्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री गुन्हे शाखेच्या जवळपास १०० पेक्षा अधिक पोलिसांनी बाबू नाडारच्या कोपरी कॉलनीतील जुगाराच्या अड्ड्यांवर एकाच वेळी घाव घालून अनेकांची धरपकड केली. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यात जुगार चालवणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. या छापेमारीत पोलिसांनी लाखो रुपयांसह जुगाराचे साहित्य ४३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या छापेमारी नंतर बाबू नाडार आणि त्याचे साथीदार फरार झाले असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी बाबू नाडार आणि त्याच्या सहकाऱ्या विरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. (Illegal Gambling)

ठाणे पूर्व कोपरी कॉलनी या परिसरातील जुगाराच्या अड्ड्यांवर ९ जानेवारी रोजी रात्री ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शिवराज पाटील यांनी दिलेल्या आदेशावरून गुन्हे शाखा घटक-१, गुन्हे शाखा, घटक-२, गुन्हे शाखा घटक-३ व गुन्हे शाखा, घटक-५ या पथकांनी कोपरी कॉलनी या ठिकाणी असलेल्या जुगारांच्या अड्ड्यावर छापेमारी केली. जवळपास शंभर पोलिसांचे पथकांनी एकत्ररित्या या ठिकाणी छापे टाकून जुगाराचे अड्डे उध्वस्त करून ४३ जणांना ताब्यात घेऊन ६ लाख ४३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांचे छापे पडल्यानंतर बाबू नाडारसह अनेकांनी कोपरीतून पळ काढला. (Illegal Gambling)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व जुगाराचे अड्डे बाबू नाडार नावाची व्यक्ती चालवत होता, त्याच्या इशाऱ्यावर कोपरी कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगाराचे अड्डे चालवले जात होते. बाबू नाडार याला गॅम्बलिंगच्या दुनियेतील किंग म्हणून ओळखले जाते. मागील ३० ते ३५ वर्षांपासून बाबू नाडार या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालवत आहे. ठाणे पूर्व कोपरी या संपूर्ण परिसरात बाबू नाडार या नावाची मोठी दहशत आहे. ठाणे पश्चिम येथील काही भागात तर संपूर्ण कोपरीमध्ये बाबू नाडार हा बिनदिक्कत मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे चालवतो. (Illegal Gambling)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर काय म्हणतात कायदेतज्ज्ञ आणि प्रमुख राजकीय नेते?)

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त जुगाराचे अड्डे हे बाबू नाडारच्या इशाऱ्यावर सुरू असतात सोशल क्लबच्या नावाखाली बेकायदेशीर जुगाराचे अड्डे, मटका, तीनपत्ती, पताडा यासारखे जुगाराचे अड्डे कोपरीमध्ये कोपऱ्याकोपऱ्यावर आढळून येत होते. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बडे आसामी या परिसरात जुगार खेळण्यासाठी येत असतात. या जुगाराच्या अड्ड्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू असते, स्थानिक पोलीस देखील बाबू नाडारच्या अड्ड्याकडे कानाडोळा करत असते, तक्रार आल्यावर छोटीमोठी कारवाई करून तक्रारदार यांचे मन राखण्याचे काम स्थानिक पोलिसांकडून होत असते. (Illegal Gambling)

बाबू नाडारच्या बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून अनेक संसार मोडले गेले तर अनेक जण देशोधडीला लागले आहेत. कोपरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावून तेथून बदली होऊन गेलेले तर सेवानिवृत्त अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार बाबू नाडार यांच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात शेकडोच्या वर गुन्हे दाखल आहेत, बाबू नाडार याच्यावर या परिसरात हल्ले देखील झाले, तसेच त्याच्या गुंडांनी देखील इतरांवर हल्ले केल्याच्या तक्रारी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बाबू नाडारचे जुगाराचे अड्डे कधीच बंद होऊ शकत नाही, यापूर्वी अनेक वेळा त्याच्यावर कारवाई झाली, त्याच्या अड्ड्यावर छापे पडलेले आहे, त्यानंतरही बाबू नाडारचे अड्डे पुन्हा सुरू झालेले आहेत. (Illegal Gambling)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.