Smriti Irani Visited Madina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मदिनेला भेट; ‘यामुळे’ पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

Smriti Irani Visited Madina : पाकने सौदी अरेबियावर टीका करतांना म्हटले की, ते केवळ पैशांकडे पहात आहेत. त्यांनी मशीद आणि थडगे यांना पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. त्यांच्यासाठी केवळ पैसेच सर्वकाही आहेत. हे चांगले नाही.

607
Smriti Irani Visited Madina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मदिनेला भेट; 'यामुळे' पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
Smriti Irani Visited Madina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मदिनेला भेट; 'यामुळे' पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

भारताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. (Smriti Irani Visited Madina) सौदी अरेबिया दौऱ्यानंतर त्या मुसलमानांसाठी पवित्र असणार्‍या मदिना येथेही गेल्या होत्या. मदिना येथे जातांना स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी साडी परिधान केली होती; मात्र त्यांनी डोके हिजाब किंवा अन्य कोणत्याही वस्त्राने झाकले नव्हते. याविषयी सौदीच्या सरकारने कोणतीही आडकाठी आणली नसली, तरी पाकिस्तानने थयथयाट केला आहे. (Smriti Irani Visited Madina)

(हेही वाचा – BMC : रविवारी मुंबईत एअर शो, मरीन ड्राईव्हवरील सर्व व्यवस्थेचा भार महापालिकेच्या तिजोरीवर)

पाकची सौदी अरेबियावर टीका

मदिना येथे जातांना महिलांनी डोके झाकण्यासाठी हिजाब परिधान करण्याचा इस्लाम (Islam) आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia) यांचा नियम आहे. डोक न झाकता येणार्‍या महिलांना शिक्षा केली जाते. त्यामुळे पाकने सौदी अरेबियावर टीका केली आहे. पाकिस्तानी नागरिकांनी सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान (Mohammed bin Salman Al Saud) यांच्यावर टीका करतांना म्हटले की, ते केवळ पैशांकडे पहात आहेत. त्यांनी मशीद आणि थडगे यांना पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. त्यांच्यासाठी केवळ पैसेच सर्वकाही आहेत. हे चांगले नाही. त्यांना समजले पाहिजे की, त्यांच्या देशाशी जगभरातील मुसलमान श्रद्धाने जोडले आहेत.

भारताच्या प्रगतीचे कौतुक

काही पाकिस्तान्यांनी या विषयावरून पाकिस्तान आणि भारत यांची तुलना करतांना भारताच्या प्रगतीचे कौतुकही केले आहे. पाकिस्तान्यांचे म्हणणे आहे की, जग बदलत आहे. सौदी अरेबिया (Saudi Arabia) स्वतःच्या लभाचा विचार करत आहे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे. यामुळे कुणीही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सौदी अरेबिया त्याच्या जुन्या परंपरांतून स्वतःला बाहेर काढत आहे. तो त्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे. यातूनच स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या दौर्‍याकडे पाहिले पाहिजे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार)

भारतासारखी बाजारपेठ महत्त्वाची

एका पाकिस्तान्याने म्हटले की, आपण इतरांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःकडे पाहिले पाहिजे. भारताने स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates) येथे मंदिरे बांधली जात आहेत. तेथील राजे भारताचा दौरा करत आहेत. प्रत्येक देश स्वतःचा लाभ पहात आहे. चीनही व्यापाराच्या दृष्टीने भारताशी जवळीक साधत आहे. कुणीही भारतासारखी बाजारपेठ गमावू इच्छित नाही. (Smriti Irani Visited Madina)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.