UBT : उबाठा गटाला आणखी एक बसणार धक्का; आता ‘मशाल’ चिन्हावरही येणार गडांतर 

353

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थेट खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. असा निर्णय दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निघून गेल्याचे स्पष्ट झाले, आता पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह निघून गेल्यानंतर जे ‘मशाल’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने उबाठा (UBT) गटाला दिले होते, आता त्या चिन्हावरही गडांतर येण्याची शक्यता आहे.

मशाल चिन्हावर याआधीच समता पक्षाने (Samata Party) दावा ठोकला होता. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.. त्यानुसार समता पक्षही आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे.. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षाने केला आहे. तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की त्यांच्या हातातून निसटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटातच वाद; सुभाष देसाई आणि अनिल देसाईंवर दोषारोप )

निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांविरोधात दाद मागण्यासाठी उबाठा (UBT) गटामध्ये हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते अनिल परब तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.