‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे (Atal Bihari Vajpayee Shivdi-Nhavasheva Atal Setu) शुक्रवारी, (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पंतप्रधान यावेळी स्वत: सेतूवरून प्रवास करीत रायगड जिल्ह्यात आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात पोहोचणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) १७ हजार कोटी रुपये खर्चून जवळपास २२ किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील १६ किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे. मुंबई-नवी मुंबईला जोडणारा हा २१.८ किमी लांबीचा पूल आहे. दोन तासांचा हा प्रवास १६ मिनिटांत पूर्ण होईल.
- २१.८ लांबीचा ६ लेन असलेला अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे.
- शिवडी, दक्षिण मुंबई ते न्हावा शेवा, नवी मुंबईपर्यंत लाखो लोकांना जोडणारा हा सागरी सेतू आहे.
- दररोज ७० हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक येथून होऊ शकते.
- प्रवासाचा वेळ दीड तासांवरून २० मिनिटांपर्यंत कमी होईल.
- मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक म्हणून विकसित झाल्याने मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरदरम्यान दुवा तयार
- पर्यावरणाशी बांधिलकी आणि टिकाऊपणाची हमी
- अटल सेतू निर्मितीसाठी १७,८०० कोटींचा खर्च
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी राहणार उपस्थित )
अन्य काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसह अन्य काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठीही मोदी शुक्रवारी दुपारी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून तिथून हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने नौदलाच्या कुलाब्यातील हवाई तळावर येतील. त्यानंतर रस्त्याने शिवडी येथे पोहोचून ‘अटल सेतू’चे उद्घाटन करतील. यानंतर त्यांचा ताफा सेतूवरून प्रवास करीत चिर्ले येथे उतरेल आणि पुढे बांधकामाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पोहोचतील. जवळपास ३० ते ४० मिनिटांचा येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने विमानतळाकडे जाऊन पुढील प्रवासाला निघणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community