थंडीची ऊब गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत जाणवायला सुरुवात झाली होती, मात्र यंदा केवळ एक दिवस १८ अंशाखाली किमान तापमान उतरले. शुक्रवारी आणि शनिवारी ३५ अंश सेल्सियस तापमान वाढीची शक्यता हवामान विभागाने (Weather Forecast) वर्तवली आहे.
गुरुवारी लोकल ट्रेन आणि घरांमध्ये पुन्हा एकदा पंख्याचा वेग वाढला होता. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर गुरुवारी कमाल तापमान २४ तासांमध्ये अनुक्रमे २.८ आणि ३.३ अंशांनी वाढले. त्यामुळे थंडीतही उकाडा जाणवत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर, कसे असेल स्वरुप? वाचा सविस्तर…)
थंडीचा ऋतु असूनही उकाडा
सध्या राज्यभरात वाऱ्याची दिशा दक्षिण आग्नेयेकडून आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ शनिवार, रविवारपर्यंत कायम राहू शकते. यामुळे मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे सध्या थंडीचा ऋतु असूनही उकाडा जाणवू शकतो, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली आहे.
थंडीची जाणीव पुन्हा होऊ शकते
– मालेगावात गुरुवारी किमान तापमान सरासरीपेक्षा ८.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. मराठवाड्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा २.५ ते ५ अंशांनी जास्त आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात सरासरीहून किमान तापमान अधिक असले तरी किमान तापमानाचा पारा २० अंशांहून कमी आहे. कोकणात मात्र हा पारा २० अंशांहून अधिक आहे. पुढच्या आठवड्यात पश्चिमी प्रकोपानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागले तर थंडीची जाणीव पुन्हा होऊ शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यात रत्नागिरीत सर्वाधिक कमाल आणि किमान तापमान रत्नागिरी येथे नोंदले गेले आहे.
– नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी १२.८ अंश सेल्सिअस तर सांगलीत सर्वाधिक २०.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
-आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यभरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरी तीन ते चार अंश सेल्सिअसनी वाढ झाली आहे.
-मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी किमान तापमानात वाढ झाली.
किमान तापमानात झालेली वाढ पुढील चार दिवस कायम
किमान तापमानात झालेली वाढ पुढील चार दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. हलका पाऊस झाल्यास कमाल तापमानात काहीशी घट होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही पहा –