Terrorist Hafiz Bhuttavi : 26/11 च्या हल्लेखोरांना प्रशिक्षण देणारा दहशतवादी हाफिज भुट्टावीचा मृत्यू

आपल्या भाषणांद्वारे २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी हल्लेखोरांना प्रशिक्षण देणारा आणि हाफिज सईदचा जवळचा मित्र असलेला हाफिज अब्दुल सलाम भुतावी जग सोडून गेला आहे. याची पुष्टी ७ महिन्यांनंतर झाली आहे.

305
Terrorist Hafiz Bhuttavi : 26/11 च्या हल्लेखोरांना प्रशिक्षण देणारा दहशतवादी हाफिज भुट्टावीचा मृत्यू

हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक अब्दुल सलाम भुट्टावी (Terrorist Hafiz Bhuttavi) याला पाकिस्तानच्या तुरुंगात ठार मारण्यात आले आहे. याची पुष्टी तब्बल ७ महिन्यांनंतर झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, हाफिज अब्दुल सलाम भुतावी हा हाफिज सईदचा सहाय्यक होता आणि त्याने मुंबई हल्ल्यात सामील असलेल्या कार्यकर्त्यांना तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले होते, तेव्हा भुट्टावीने (Terrorist Hafiz Bhuttavi) किमान दोन वेळा लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाचा काळजीवाहू म्हणून काम केले होते.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर, कसे असेल स्वरुप? वाचा सविस्तर…)

भुट्टावीने समूहाचे दैनंदिन कामकाज हाताळले –

नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांनी हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले आणि जून २००९ पर्यंत त्याला कोठडीत ठेवण्यात आले. या काळात, भुट्टावीने (Terrorist Hafiz Bhuttavi) समूहाचे दैनंदिन कामकाज हाताळले आणि संघटनेच्या वतीने स्वतंत्र निर्णय घेतले. मे २००२ मध्ये हाफिज सईदलाही अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा – America Air Strike On Houthi : येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनचा हल्ला)

मुंबई हल्ल्यात १५० हून अधिक लोक मारले गेले –

तो लष्कर-ए-तोयबा (Terrorist Hafiz Bhuttavi) आणि जमात-उद-दावाच्या नेत्यांपैकी एक होता. तो संघटनेच्या सदस्यांना सूचना देत असे आणि लष्कर आणि जमात-उद-दावाच्या कारवायांसाठी फतवे जारी करत असे. आपल्या भाषणांद्वारे त्याने नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी कार्यकर्त्यांना तयार करण्यात मदत केली. मुंबई हल्ल्यात १५० हून अधिक लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले.

(हेही वाचा – Bhagwan Das: भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कारप्राप्त आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ “भगवान दास”)

लष्कर-ए-तोयबाच्या संघटनात्मक तळ उभारण्याचा प्रभारी –

तो (Terrorist Hafiz Bhuttavi) लष्कर आणि जमात-उद-दावाच्या मदरशांच्या जाळ्यासाठी जबाबदार होता. २००२च्या मध्यात, तो पाकिस्तानातील लाहोर येथे लष्कर-ए-तोयबाच्या संघटनात्मक तळ उभारण्याचा प्रभारी होता. भुट्टावी याचे २९ मे २०२३ रोजी पंजाब प्रांतातील मुरीदके येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी तो पाकिस्तानच्या ताब्यात होता. (Terrorist Hafiz Bhuttavi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.