Bhavesh Bhatt: गुजराती गझलेतील नाविन्यपूर्ण आणि आधुनिकतेचे अग्रदूत

२००९ मध्ये ’छे तो छे’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. पुढे २०१४ मध्ये भितरनो शंखनाद हा संग्रह आला.

214
Bhavesh Bhatt: गुजराती गझलेतील नाविन्यपूर्ण आणि आधुनिकतेचे अग्रदूत
Bhavesh Bhatt: गुजराती गझलेतील नाविन्यपूर्ण आणि आधुनिकतेचे अग्रदूत

गुजरातीतील सुप्रसिद्ध गझलकार भावेश भट्ट! (Bhavesh Bhatt) त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७५ रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदाबादच्या अंकुर हायस्कूलमध्ये घेतले आणि माध्यमिक शिक्षण एचबी कपाडिया हायस्कूलमधून १९८९ मध्ये पूर्ण केले तसेच १९९० मध्ये बी.व्ही. हायस्कूलमधून दहावी आणि १९९२ मध्ये आशिष हायस्कूलमधून १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

१९९४ मध्ये त्यांनी गुजरात कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स करण्यासाठी प्रवेश घेतला. पण पहिल्या वर्षानंतर त्यांनी शिक्षण सोडले. त्यांनी अगदी तरुण वयापासूनच म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षापासून गझल लिहायला सुरुवात केली. त्यांची पहिली गझल ’कवीलोक’ गुजराती कविता जर्नलमध्ये छापून आली होती. त्याचबरोबर गझल विश्व, शब्दसृष्टी, धबक, तद्यर्थ, शब्दसार इत्यादी मासिकांमध्ये त्यांच्या गझला प्रकाशित झाल्या आहेत.

२००७ मध्ये त्यांच्या गझला विस पंचामध्ये अनिल चावडा, अशोक चावडा, हरद्वार गोस्वामी अशा इतर तरुण कवींसह छापून आल्या. विशेष म्हणजे ते उर्दू गझल देखील लिहितात. २००९ मध्ये ’छे तो छे’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. पुढे २०१४ मध्ये भितरनो शंखनाद हा संग्रह आला. प्रेम हा त्यांच्या गझलांचा प्रमुख विषय असतो. त्याचबरोबर समकालीन जीवन, सामाजिक विरोधाभास इत्यादी विषयांना देखील ते सुंदररित्या हात घालतात.

शायदा आणि राजीव पटेल पुरस्कार प्रदान ! 

त्यांना २०१४ मध्ये गुजरात समाचारद्वारे राजीव पटेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्याच वर्षी शायदा पुरस्काराने त्यांना गौरव करण्यात आला आणि कोलकोता येथील भारतीय भाषा परिषदेतर्फे त्यांना युवा पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे. आता वयाच्या ४८ व्या वर्षी ते विपुल लेखन करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.