-
ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १४ महिन्यांनंतर पुनरागमन करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) मोहालीत दुसऱ्याच चेंडूवर दुसरा सलामीवीर शुभमन बरोबर योग्य समन्वय न राखल्यामुळे धावचीत झाला. आणि अशाप्रकारे भोपळाही न फोडता आल्यामुळे तो शुभमनवर चिडलेला दिसला.
आधी त्याने हताशपणे आकाशाकडे पाहिलं. आणि नंतर शुभमनकडे पाहून त्याने एक चिडका कटाक्ष दिला.
Rohit gone for duck 😭#RohitSharma #Gill #IndvsAfg #INDvAFG pic.twitter.com/xpSGnreCm5
— Shubham Chand (@shubhamchand768) January 11, 2024
(हेही वाचा – Bhavesh Bhatt: गुजराती गझलेतील नाविन्यपूर्ण आणि आधुनिकतेचे अग्रदूत)
अफगाणिस्तानच्या १५८ धावांचा पाठलाग करताना भारतीय डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताला हा धक्का बसला. रोहितने फारुकीचा एक चेंडू जोरदार मिडऑनकडे टोलवला. लगेचच रोहितने धाव घ्यायला सुरुवात केली. पण, दुसरा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) चेंडू कुठे गेला हे पाहत बसला होता, त्याने रोहितला धावेसाठी प्रतिसाद दिला नाही. झदरानने चेंडू अडवला. आणि तो यष्टीरक्षकाकडे फेकला. रोहीत बाद झाला.
त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि शुभमनसाठीचा राग लपून राहिला नाही. रोहित बाद झाल्यावर शुभमन आणि तिलक वर्माही चांगल्या सुरुवातीनंतर अचानक बाद झाले. त्यामुळे १० षटकांत भारताची अवस्था ३ बाद ७२ अशी झाली होती. अखेर शिवम दुबे आणि जितेन शर्मा यांनी ४५ धावांची भागिदारी करत भारतीय गाडी रुळावर आणली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community