LAC Situation : एलएसी’वर अजूनही संवेदनशील परिस्थिती- सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे

भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भक्कमपणे पुढे जात आहे. भारतीय लष्कर देशातील विविध एजन्सी आणि राज्याच्या सरकारांसोबत मिळून काम करत राहतील, असेही सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.

177
LAC Situation : एलएसी'वर अजूनही संवेदनशील परिस्थिती- सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे

भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) परिस्थिती स्थिर (LAC Situation) असली तरी संवेदनशील असल्याची माहिती सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिली. आगामी 15 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या सैन्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियमती पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.

परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्य तैनात –

यावेळी जनरल मनोज पांडे यांनी पूर्व लद्दाखमधील वादावर चीनचे नाव न घेता सांगितले की, उत्तर सीमेवरील (LAC Situation) परिस्थिती सामान्य होण्याबरोबरच संवेदनशीलसुद्धा आहे. येथील परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्य तैनात आहे. तसेच सैन्याची संख्या ही कायम राखली जाणार आहे. भारत याठिकाणी सज्ज असून आमची तयारी उच्च स्तराची आहे.

(हेही वाचा – ISRO: पहिलं भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट, २०२८ पर्यंत साकारणार पहिली आवृत्ती)

घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले –

पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या (LAC Situation) प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. देशाच्या सीमेवरील हिंसाचाराच्या घटना २०२३ मध्ये कमी झाल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. तसेच जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्येही घट नोंदवल्याचे पांडे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ayodhya-Ahmedabad Air Service : ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेची सुरुवात)

लष्करामध्ये नवे तंत्रज्ञान आणले जात आहे –

भारतीय लष्कराने राष्ट्रहितासाठी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सैन्यामध्ये वेळेच्या मागणी अनुरूप आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला अधिक सामंजस्यपूर्ण आणि भक्कम बनवण्यात आले आहे. यावेळी मणिपूरमधील स्थितीबाबत लष्करप्रमुखांनी (LAC Situation) सांगितले की, संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर शांतता प्रस्थापित झाली आहे. लष्करामध्ये नवे तंत्रज्ञान आणले जात आहे. उत्तम दळणवळण आणि संचार व्यवस्था, ड्रोन आणि सर्विलेंस सर्वांना समाविष्ट केले जात आहे. भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भक्कमपणे पुढे जात आहे. भारतीय लष्कर देशातील विविध एजन्सी आणि राज्याच्या सरकारांसोबत मिळून काम करत राहतील, असेही सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. (LAC Situation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.