-
ऋजुता लुकतुके
अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) हीच सलामीची जोडी असेल असं स्पष्ट केलं होतं. पण, अचानक मोहाली सामन्यापूर्वी संघ जाहीर करताना रोहित बरोबर शुभमन गिलचं नाव घेतलं गेलं. आणि यशस्वी संघातच नव्हता.
पण, रोहितने नाणेफेकीच्या वेळी एक गोष्ट स्पष्ट केली. ‘कुलदीप, आवेश आणि संजू यांना संघातून वगळण्यात आलंय. पण, यशस्वी जायबंदी आहे. म्हणून खेळत नाहीए,’ असं रोहित म्हणाला. पण, मग हा प्रश्न उभा राहिला की, यशस्वीला झालंय काय?
अखेर बीसीसीआयने ट्विटरवरून या गोष्टीचं स्पष्टीकरण थोड्या वेळात दिलं.
(हेही वाचा – ISRO: पहिलं भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट, २०२८ पर्यंत साकारणार पहिली आवृत्ती)
UPDATE: Mr Yashasvi Jaiswal was unavailable for selection for the first T20I due to a sore right groin.#INDvAFG
— BCCI (@BCCI) January 11, 2024
यशस्वी जयसवालने (Yashasvi Jaiswal) सकाळच्या सत्रात इतर खेळाडूंबरोबर सरावही केला होता. त्यानंतर अचानक त्याला वेदना जाणवायला लागली. आणि त्यामुळे तो पहिला टी-२० सामना खेळू शकला नाही. पण, त्याच्या दुखापतीचं नेमकं स्वरुप काय आहे. आणि तो दुसऱ्या सामन्यापूर्वी फिट होईल का याबद्दल अजूनही स्पष्टता नाही.
सलामीला उजव्या आणि डावखुऱ्या फलंदाजाची जोडी असावी या दृष्टीने प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित आणि यशस्वीच्या नावाला पसंती दिली होती. पण, अखेर पहिल्या सामन्यात तरी रोहितबरोबर शुभमन गिल सलामीला आला. यशस्वीला आणखी एक दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार आहे. शिवाय टी-२० विश्वचषक समोर असल्यामुळे बीसीसीआयही खेळाडूंच्या दुखापतीविषयी जोखीम पत्करायला तयार होणार नाही. त्यामुळे कदाचित दुसऱ्या सामन्यालाही यशस्वी मुकू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community