Mental Health: मानसिक आरोग्यासाठी ‘या’ अॅपद्वारे सल्ला, तीन भाषांचे पर्याय उपलब्ध

रुग्णालयाने विकसित केलेल्या या अॅपमध्ये क्विझ, सेल्फ-हेल्प झोन आणि तज्ज्ञांची मदत असे तीन विभाग आहेत. क्विझमध्ये नैराश्यासाठी मानक स्केलवर आधारित रुग्णाच्या आरोग्य प्रश्नावलीचा समावेश आहे.

153
Mental Health: मानसिक आरोग्यासाठी 'या' अॅपद्वारे सल्ला, तीन भाषांचे पर्याय उपलब्ध
Mental Health: मानसिक आरोग्यासाठी 'या' अॅपद्वारे सल्ला, तीन भाषांचे पर्याय उपलब्ध

कोरोनानंतर मानसिक आजार (Mental Health) वाढले असून अनेक जण डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाहीत, अशा रुग्णांसाठी केईएम रुग्णालयाने ‘सक्षम’ अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे मानसिक प्रश्न जाणून घेण्यात येतील. गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञाचा सल्लाही मिळेल, असे या अॅपसाठी पुढाकार घेणाऱ्या केईएम रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही मिळेल, अशी माहिती या अॅपसाठी पुढाकार घेणाऱ्या मानसोपचार विभागाच्या प्राध्यापिका डॉ. नीना सावंत यांनी दिली.

राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, मानसिक रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, असून तब्बल ७५ ते ८० टक्के लोक रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य सुधारणे हे या अॅपचे उद्दिष्ट आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

रुग्णालयाने विकसित केलेल्या या अॅपमध्ये क्विझ, सेल्फ-हेल्प झोन आणि तज्ज्ञांची मदत असे तीन विभाग आहेत. क्विझमध्ये नैराश्यासाठी मानक स्केलवर आधारित रुग्णाच्या आरोग्य प्रश्नावलीचा समावेश आहे. अॅप वापरताना कंटाळा येऊ नये, यासाठी एका खेळाप्रमाणे डिझाईन केले आहे. हे अॅप वापरकर्त्याचे मानसिक आरोग्य स्कोअरचे विश्लेषण करण्यात मदत करते.

(हेही वाचा – LAC Situation : एलएसी’वर अजूनही संवेदनशील परिस्थिती- सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे)

मानसोपचार तज्ज्ञांची मदत आवश्यक असल्यास तसा सल्लाही मिळतो. जवळच्या सरकारी सुविधेची माहिती दिली जाते. सेल्फ हेल्प झोनमध्ये टेलिमानस हेल्पलाईन नंबरदेखील आहेत. बहुतेक जण स्व-मदत क्षेत्र वापरत आहेत. बहुतेक जण स्व-मदत क्षेत्र वापरत आहेत, असे डॉ. नीना सावंत यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना

‘सक्षम’ हे अॅप बनवण्यासाठी ६ महिने लागले. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या ३ भाषांमध्ये हे अॅप असणार आहे. अॅंड्रॉईड प्ले स्टोअरवर एका आठवड्यात ४८२हून अधिक लोकांनी अॅप डाऊनलोड केले आहे. राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही या अॅपच्या माध्यमातून माहिती मिळावी, यासाठी आरोग्य विभाग आणि आशा कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची योजना आखत आहेत, अशी माहिती मानसोपचार विभागाच्या प्राध्यापिका डॉ. नीना सावंत यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.