Shankaracharya Rammandir : चारही शंकराचार्यांची राममंदिराविषयीची भूमिका काय ? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले…

356
Shankaracharya Rammandir : चारही शंकराचार्यांची राममंदिराविषयीची भूमिका काय ? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले...

२२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रणे सर्वांना दिली जात आहेत. हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु असलेले शंकराचार्यही या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (Shankaracharya Rammandir) याविषयी चारही पिठांच्या शंकराचार्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ३ शंकराचार्यांनी या सोहळ्याला पाठिंबा दिला आहे.

(हेही वाचा – Narendra Modi: नाशिकमध्ये नरेंद्र मोदींवर पुष्पवृष्टी, काळारामाचेही घेतले दर्शन)

२ शंकराचार्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा

आतापर्यंत २ शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. (Ram Mandir Ayodhya) विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, द्वारकापीठ (Dwarkapeeth) आणि शृंगेरी शारदा पीठाच्या (Sringeri Sharada Peeth) शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती (Swami Nishchalananda Saraswati) यांनीही या सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. मात्र ते आता सोहळ्यास उपस्थित राहणार नसून योग्य वेळी दर्शन घेण्यास येणार आहेत.

शंकराचार्यांच्या भूमिकेचे चुकीचे आकलन 

केवळ उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteswarananda Saraswati) यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात भूमिका मांडली आहे. “बाकी तीनही शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समर्थन करत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेचे चुकीचे आकलन माध्यमांनी केले”, असे आलोक कुमार यांनी सांगितले.

”सनातन धर्माच्या अनुयायांसाठी हा आनंदाचा क्षण आहे”, शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ (Swami Bharatikrishna Shrine) म्हणाले. द्वारका पीठाच्या (Dwarkapeeth) शंकराचार्यांनी ‘माध्यमांत माझ्या नावाने प्रसिद्ध झालेली विधाने माझ्या परवानगीविना छापली गेली आहेत’, असे लेखी निवेदन जाहीर केले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी ठरले पहिले पंतप्रधान)

धर्मविरोधी शत्रूंनी जाणूनबुजून केलेला कांगावा – शृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य

शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात असल्याची विधाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी अशा प्रकारचे कुठलेही विधान केलेले नाही. धर्मविरोधी शत्रूंनी जाणूनबुजून हा कांगावा केला असल्याचा संशय व्यक्त केला. मी या सोहळ्याला शुभेच्छा देतो.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली नाराजी

हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे, हे चुकीचे आहे. मोदी मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. मग मी तिथे उपस्थित राहून काय करू? तिथे उभे राहून फक्त टाळ्या वाजवू का”, अशी टीका उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteswarananda Saraswati) यांनी केली होती. त्यांनी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला होता. त्यात त्यांनी राममंदिराचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे चारही पिठांचे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. (Shankaracharya Rammandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.