PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी ठरले पहिले पंतप्रधान

येवल्याच्या पैठणीचा शेला देत आणि पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले.

209
PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी ठरले पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Nashik Visit) हे आज (१२ जानेवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन केले तसेच त्याचबरोबर, नाशिकच्या काळाराम मंदिरात नतमस्तक झाले. नाशिकच्या ऐतिहासिक आणि प्राचीन अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi Nashik Visit) हा नाशिक दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळांची पाहणी)

पंतप्रधान मोदींनी केली प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा –

काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Nashik Visit) हे मुख्य दरवाजाने दाखल झाले. यावेळी येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती केली. त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षाचे पठण करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले. (PM Narendra Modi Nashik Visit)

(हेही वाचा – ISRO: पहिलं भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट, २०२८ पर्यंत साकारणार पहिली आवृत्ती)

नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो –

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Nashik Visit) शुक्रवार १२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिकच्या निलगिरी बाग येथे पोहोचले. त्यानंतर त्यांचा नाशिकमध्ये भव्य रोड शो झाला. त्यांच्यासोबत तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी हजारो नागरिकांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टि करण्यात आली. तसेच ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Nashik Visit) यांचा ताफा रामकुंड परिसराकडे वळला. तेव्हा त्यांनी जलपूजन आणि गोदावरीची आरती केली.

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्या – राज्यपालांचे माध्यमांना आवाहन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन स्वागत करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.