-
ऋजुता लुकतुके
भारोत्तोलक मीराबाई चानू (Mirabai Chanu) आणि भालाफेकपटू किशोर जाना या दोघांचे परदेशात सराव करण्याचे प्रस्ताव क्रीडा मंत्रालयाने मंजूर केले आहेत. किशोर जाना ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं ७८ दिवस सराव करणार आहे. तर मीराबाई चानू (Mirabai Chanu) पूर्वी जिथे सराव करायची त्या सेंट लुईस इथल्या केंद्रातच एका महिन्यासाठी सराव करणार आहे.
मीराबाईचे प्रशिक्षक विजय शर्माही तिच्याबरोबर असणार आहेत. आणि मीराबाई तिथे एरॉन हॉरशिग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. दुखापतीतून नुकती सावरेली मीराबाई इथं रिहॅबिलिटेशनवर लक्ष केंद्रीत करणार आहे. मीराबाई तसंच तिच्या प्रशिक्षकांचा अमेरिकेत जाण्या-येण्याचा, तिथे राहण्याचा, तिथलं प्रशिक्षण आणि इतर उपचार असा सगळा खर्च क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – BMC : पवार यांची बदली, सोपवली सहआयुक्त (विशेष) ची जबाबदारी)
भारताच्या ‘टारगेट ऑलिम्पिक पोडिअम योजना’ या योजनेअंतर्गत या खर्चांना मान्यता देण्यात आली आहे. फक्त मीराबाई चानू (Mirabai Chanu) आणि किशोर जानाच नाही तर देशातील इतरही काही ॲथलीटच्या खर्चाला आणि परदेशवारीला क्रीडा मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
कुस्तीपटू दीपक पुनिया, आशू आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनाही परदेशवारीसाठी क्रीडा मंत्रालय मदत करणार आहे. दीपक पुनिया अमेरिकेत मिशिगन इथं महिनाभर सराव करणार आहे. तर इतर कुस्तीपटू कझाकिस्तानमध्ये अलमाटी इथं जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community