Municipal Recruitment Scam : पश्चिम बंगालमध्ये मंत्री आणि आमदार यांच्या घरावर EDची धाड

Municipal Recruitment Scam : ईडीने कोलकाताबाहेरील ठिकाणीही छापे टाकले आहेत. चौकशीसाठी ईडी पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरी पोहोचली. महापालिका भरती घोटाळ्यासंदर्भात ही झडती चालू आहे.

173
Municipal Recruitment Scam : पश्चिम बंगालमध्ये मंत्री आणि आमदार यांच्या घरावर EDची धाड
Municipal Recruitment Scam : पश्चिम बंगालमध्ये मंत्री आणि आमदार यांच्या घरावर EDची धाड

शुक्रवार, 12 जानेवारी रोजी सकाळी ईडीने पश्चिम बंगालचे (West Bengal) मंत्री सुजित बोस (Sujit Bose) आणि आमदार तापस रॉय (Tapas Roy) यांच्या घरावर छापा टाकला. महापालिका भरती घोटाळ्यासंदर्भात (Municipal Recruitment Scam) ईडीकडून कोलकाता (Kolkata) येथील तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांच्या घरांची झडती सुरु केली आहे. ही झडती दुपारपर्यंत सुरु होती.

(हेही वाचा – PM Narendra Modi : १० वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची चर्चा व्हायची, आज कोट्यवधींच्या प्रकल्पांची चर्चा होतेय; पंतप्रधानांनी काँग्रेसच्या राजवटीशी केली तुलना)

ईडीने कोलकाताबाहेरील (Kolkata) ठिकाणीही छापे टाकले आहेत. चौकशीसाठी ईडी पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरी पोहोचली. पश्चिम बंगालचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) याविषयी म्हणाले की, हे सर्व चोर आहेत. पश्चिम बंगालच्या लोकांना त्यांना तुरुंगात पहायचे आहे.

तृणमूल काँग्रेसचे भाजपवर आरोप

तृणमूल कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष (Kunal Ghosh) म्हणाले, ”ईडी हे सर्व भाजपच्या आदेशानुसार करत आहे. राज्यात भाजपचा पराभव झाला असून तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) सामोरे जाण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एजन्सीचा गैरवापर होत आहे.”

(हेही वाचा – Annapoorani : श्रीरामाचा अवमान आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटातील दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्रीवर गुन्हा दाखल)

बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) या यंत्रणांच्या माध्यमातून चालू होती. या काळात पालिकेच्या विविध नोकरभरतीतील अनियमितता संस्थांच्या निदर्शनास आली. शिक्षक भरती घोटाळ्याच्या (Teacher Recruitment Scam) प्रकरणी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी कोलकाता बिल्डर अयान सिलच्या कार्यालयावर छापा टाकला होता. (Municipal Recruitment Scam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.