शिवडी-न्हावाशेवा सेतूला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. हा सेतू नावाप्रमाणेच अटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू हा भूकंपाचे मोठमोठे धक्के सहन करण्यास सक्षम आहे. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला.
शुक्रवार, १२ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राज्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले आहे. यामध्ये शिवडी-न्हावा शेवा दरम्यानच्या अटल सेतूचे उद्घाटन, उरण-खारकोपर रेल्वे मार्गाचे उद्घाटन आदींचा समावेश आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले असते, असे CM Eknath Shinde म्हणाले.
हा सेतू विजयच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे. जसे सागरी सेतू बांधून श्रीरामाने अहंकाराला मारले होते, तसे हा सेतूही अहंकाऱ्यांचा अहंकार संपवणार आहे. पंतप्रधान मोदी देशभरात सद्भावनेचा पूल बांधत आहेत, अब कि बार ४०० पार हे ध्येय ठरवले आहे, महाराष्ट्रात अबकी बार ४५ पार ध्येय आहे. विकासाच्या माध्यमातून हे आम्ही साध्य करणार आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त इन्फ्रा प्रकल्प सुरु आहेत, हा सेतू पुणे, गोवा, वसई-विरार यांना जोडणारा आहे. हा सेतू अर्थव्यवस्था बदलणारा ठरणार आहे. सरकार अतिशय गतीने काम करत आहे. ५०-६० वर्षात जे करू शकले नाही ते मोदींनी करून दाखवले आहे. त्यामुळे भलेभले देश मोदींचे नाव अभिमानाने घेत आहेत. विकासाच्या मुद्यावर केंद्र कायम आमच्यासोबत आहे. लेख लाडकी लखपती ही योजना सुरु होत आहे. देशात कोट्यवधी राम भक्तांचे राम मंदिर झाले पाहिजे हे स्वप्न होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी मोदींचे कौतुक केले असते, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community