Abhijit Rane : कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपाच्या मुंबई सचिव पदी नियुक्ती

804

धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे (Abhijit Rane) यांचा भाजप मुंबई सरचिटणीस सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव बांगुरनगर येथील अयप्पा मंदीराच्या सभागृहात भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सुनील राणे यांनी अभिजीत राणे यांची भाजपाच्या मुंबई सचिव पदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली. गोरेगाव (प.) बांगुरनगर येथील अय्यपा सेवा संगम सभागृह येथे धडक कामगार युनियनच्या मेळाव्यात भाजपाचे मुंबई सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत युनियनच्या शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामगारांच्या साक्षीने पक्षप्रवेश केला. यावेळी युनियनच्या काही पदाधिकाऱ्यांनीही अभिजीत राणे यांच्या नेतृत्तवावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला.

अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनची स्थापना 28 एप्रिल, 2011 साली केली. आज युनियनला 13 वर्षे झाली असुन या 13 वर्षात युनियनचे साडे सात लाखांहुन अधिक सदस्य असुन प्रथम एक युनियन स्थापन केली असताना आज धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत 75 हुन अधिक युनियन महासंघात येतात. दिपप्रज्वलन व गणेशवंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. व्यासपिठावर सुनिल राणे व अभिजीत राणे (Abhijit Rane) यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष ॲड. मुरली पणिकर व भाजपा नेते रामकुमार पाल उपस्थित होते. यावेळी धडक कामगार युनियनच्या श्री रामाच्या दिनदर्शिकेचे तसेच मोबाईल स्टँड, कंप्युटर डेस्क पॅड आदींचे पाहूण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सुनील राणे यांनी भाजपाचे मफलर घालून अभिजीत राणे यांचा भाजपात पक्ष प्रवेश केला. यावेळी अभिजीत राणे यांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला. युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून सुनिल राणे व अभिजीत राणे यांना भव्य पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या. सुनिल राणे यांनी धडकच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, मी अभिजीत राणे यांचे भाजपा परिवारात स्वागत करतो. त्यांचे धडक कामगार युनियनचे काम मी पाहिलेले आहे. त्यांनी एका शिस्तीने युनियन चालवली आहे. भाजपा पक्ष हा मुख्यतः शिस्तीसाठी ओळखला जातो व ते भाजपा परिवारातही जबाबदारीने काम करतील याचा मला आत्मविश्वास आहे. आज त्यांची मुंबई सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

(हेही वाचा Atal Setu : शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूने प्रवास करणार असाल, तर ही बातमी वाचाच…)

अभिजीत राणे (Abhijit Rane) यांनी आभार प्रदर्शन करताना, आज मी माझ्या युनियनला प्रत्येक वेळी आशिर्वाद देणारे व माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने भाजपाचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार निदेशानुसार भाजपा मुंबई सरचिटणीस सुनील राणे यांच्या मुख्य उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. माझा निर्णय योग्य आहे कि नाही हे आपल्याकडून जाणुन घेण्यासाठी आज हा मेळावा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण साजरा करतो आहोत. यापुढे धडक कामगार युनियन बरोबरच मी एक नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. भाजपा पक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 2014 मध्ये सत्तेत आला. 1980 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला आज जरी सत्ता असली तरी त्या मागचा एवढ्या वर्षाचा संघर्ष खूप काही शिकवून जातो. त्यावेळचा जनसंघ तो आजचा सत्तेत असलेल्या भाजपाचा संघर्षच मला या पक्षात घेऊन आला. माझ्याबरोबर आलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मी स्वागत करतो. असे यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरज भोईर यांनी केले, तर गणेशवंदना कथक नृत्यांगणा मुद्रा तांबोळी यांनी सादर केली. कार्यक्रमास फरिद शेख, कमलेश वैष्णव, नितीन खेतले, प्रकाश पवार, मनिशा यादव, महेश पवार, रवि बनसोडे, बबन आगडे, आरती सावंत, सत्यविजय सावंत, रोहीत गुडेकर, अभिषेक चव्हाण आदींनी विशेष मेहनत घेतली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.