नबनीता देव सेन (Nabaneeta Dev Sen) या भारतीय लेखिका आणि शिक्षणतज्ञ होत्या. कला आणि साहित्याचा अभ्यास केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. भारतात परतल्यानंतर त्या अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये शिकवू लागल्या. त्यांनी अनेक साहित्यिक संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले होते. २००० मध्ये त्यांना पद्मश्री आणि १९९९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नबनीतादेव सेन (Nabaneeta Dev Sen) यांचा जन्म कोलकाता येथे १३ जानेवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे आई-वडील दोघेही कवी होते. नरेंद्र देव आणि राधारानी देवी असे त्यांचे नाव. त्यांनी बंगालीमध्ये ८० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. कविता, कादंबरी, लघुकथा, नाटके, साहित्यिक टीका, निबंध, प्रवासवर्णने, विनोद लेखन, अनुवाद आणि बालसाहित्य इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी हाताळला आहे. त्यांनी रामायणातील सीतेचे वर्णन अतिस्य वेगळ्या पद्धतीने केले आहे.
प्रथम प्रत्यय हा त्यांचा पहिला कविता संग्रह १९५९ मध्ये प्रकाशित झाला. स्वागतो देबदूत हा त्यांचा दुसरा काव्य संग्रह. आनंद बाझार पत्रिकामध्ये आमी अनुपन ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यांनी बालसाहित्यात खूप मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे त्या बंगाली, इंग्रजी, हिंदी, ओरिया, आसामी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, संस्कृत आणि हिब्रू भाषा वाचू शकत होत्या. ७ नोव्हेंबर २०१९ मध्ये कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community