Crime News : मिठी नदीत सापडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, अनैतिक संबंधातून केली होती हत्या

कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एमटीएनएल जवळ असणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात ५ जानेवारी रोजी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.

474
Crime News : मिठी नदीत सापडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, अनैतिक संबंधातून केली होती हत्या
Crime : मिठी नदीत मिळून आलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, अनैतिक सबंधातून केली हत्या

मुंबई –

मिठी नदीच्या पात्रात मिळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यास मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे.५ जानेवारी रोजी मिठी नदीत मृत अवस्थेत मिळून आलेल्या २३ वर्षीय रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने गोवंडी शिवाजी नगर परिसरातून ३ जणांना अटक केली आहे. अनैतिक सबंधाच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. (Crime News)

कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एमटीएनएल जवळ असणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात ५ जानेवारी रोजी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपमृत्यू दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.या अपमृत्यूचा संलग्न तपास गुन्हे शाखे कक्ष ५ चे पथक देखील करीत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई तसेच पूर्व उपनगरात दाखल असलेले हरविलेल्या व्यक्तीचा माहिती मागवून मृतदेहाची ओळख पटविण्यास सुरुवात केली असता ५ जानेवारी रोजीच शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एका महिलेने भाऊ हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गुन्हे शाखाने कक्ष ५चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनीता भोर, अजित गोंधळी, सपोनि.अमोल माळी,जयदीप जाधव,पोउनि. बेंडाले,सपोउनी अंकुश न्यायनिर्गुणे, अशोक भुजबळ, राणे, पो. ह. विलास देसाई, नितेश विचार, चिलप, पाटील,निरभवणे आणि पथक यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व्यक्तीची ओळख पटवली असता मिठी नदीत मिळून आलेल्या मृत व्यक्ती असल्याचे समोर आले. (Crime News)

(हेही वाचा – Pandit Shiv Kumar Sharma : काश्मीरच्या पारंपरिक संतूर वाद्याचा नाद जागतिक स्तरावर पोहोचवणारे शिवकुमार शर्मा)

अमन शेख (२३) असे मृत व्यक्तीचे नाव असून अमन शेख रिक्षा चालक असून शिवाजी नगर येथे बहिणीसोबत राहत असल्याचे समोर आले. दरम्यान अमन शेख याची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचे वैद्यकीय तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी नगर परिसरातील तसेच मिठी नगर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या आदल्या दिवशी त्यात काही संशयित अमन शेख यांच्यासोबत आढळून आले. दरम्यान पोलिसांनी संशयावरून नफिस खान(३६),मुकेश पाल(२८) आणि मोहम्मद साकीब (२४) यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. (Crime News)

आरोपी नफिस खान हा शिवाजी नगर परिसरात पत्नी आणि मुलांसह राहण्यास आहे, त्याच्या स्वतःच्या ६ रिक्षा असून त्याने त्या रिक्षा पैकी एक रिक्षा अमन शेख हा भाडेतत्वावर चालवत होता. अमन याचे नफिस खानच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नफिसला होता, त्याने यापूर्वी त्याला समजावले होते, अमन समजावुन ऐकत नाही हे बघून नफिस ने त्याला संपविण्याचा कट रचला. ४ जानेवारी रात्री पत्नी आणि मुले घरी नसताना नफिस याने अमन घरी बोलावून घेतले, दरम्यान तिन्ही आरोपी घरीच होते. नफिस आणि इतर आरोपीनी नशा केली होती, या दरम्यान नफिस आणि अमन यांच्यात भांडण झाले, या भांडणात नफिस आणि इतर सहकाऱ्यांनी अमनचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर पहाटे त्याचा मृतदेह एका रिक्षात टाकून मृतदेह मिठी नदीच्या पात्रात टाकून दिला अशी कबुली आरोपीने दिल्याचे पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण१) राज तिलक रोशन यांनी दिली. (Crime News)

गुन्हे शाखा कक्ष ५च्या पथकाने नफिस याच्या घराची झडती घेतली असता नफिसच्या घरात दोन रिव्हॉल्वर,एक कुकरी आणि एक चाकू मिळून आला. नफिस हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोशन यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.