-
ऋजुता लुकतुके
येत्या २५ तारखेपासून इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका हैद्राबादला सुरू होत आहे. पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघाची निवड शुक्रवारी उशिरा करण्यात आली आहे. यावेळी निवड समितीने सध्याच्या नियमित खेळाडूंचीच निवड केली आहे. फक्त ध्रुव जेरेल हा एकमेव नवीन चेहरा संघात आहे. तर के एल राहुल आणि ध्रुवबरोबरच कोना भरत या तिसऱ्या यष्टीरक्षकाची निवडही अजित आगरच्या निवड समितीने केली आहे.
मोहम्मद शामी अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. तर ईशान किशनने मानसिक थकव्याचं कारण देत सुटी घेतली आहे. त्यामुळे या दोघांचा संघात समावेश नाही. रोहित शर्माच्या कप्तानीखाली एकत्र येणाऱ्या या संघात जसप्रीत बुमरा उपकप्तान असेल.
An action-packed Test series coming 🆙
Check out #TeamIndia‘s squad for the first two Tests against England 👌👌#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vaP4JmVsGP
— BCCI (@BCCI) January 12, 2024
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे दोन फिरकी गोलंदाज संघात आहेत. आणि त्यांच्या जोडीला असेल अनुभवी रवीचंद्रन अश्विन. तर तेज गोलंदाज म्हणून जसप्रीत आणि सिराजच्या साथीला आवेश खान आणि मुकेश कुमारही असतील.
(हेही वाचा – Local services : ‘पुणे ते लोणावळा’दरम्यान बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या वेळ)
प्रसिध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या आफ्रिकेत खेळलेल्या तेज गोलंदाजांना वगळण्यात आलं आहे. भारतीय वातावरणात तीन फिरकी गोलंदाज खेळवले तर यष्टीरक्षणाची जबाबदारी कोना भरतवर येऊ शकते.
इंग्लंड विरुद्ध पहिल्या २ कसोटींसाठी भारतीय संघ,
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, कोना भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आवेश खान व मुकेश कुमार
भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक
पहिली कसोटी – २५ ते २९ जानेवारी – हैद्राबाद
दुसरी कसोटी – २ ते ६ फेब्रुवारी – विशाखापट्टणम
तिसरी कसोटी – १५ ते १९ फेब्रुवारी – राजकोट
चौथी कसोटी – २३ ते २७ फेब्रुवारी – रांची
पाचवी कसोटी – ७ ते ११ मार्च – धरमशाला
हेही पहा –
Join Our WhatsApp Community