अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांच्या विशेष धार्मिक अनुष्ठानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. नाशिकमधील पंचवटी येथून मोदींनी धार्मिक अनुष्ठानाला सुरुवात केली आहे.
याविषयी ‘X’वर मोदींनी लिहिले आहे की, मी भावनांनी ओथंबून गेलो आहे. आयुष्यात प्रथमच मी अशा भावना अनुभवत आहे. जे स्वप्न अनेक पिढ्यांनी संकल्पाप्रमाणे आपल्या ह्रदयात जपले ते स्वप्न जसेच्या तसे साकारताना पाहण्याचे सौभाग्य मला प्राप्त होत आहे. पंतप्रधानांनी एका ध्वनिमुद्रित संदेशात त्यांनी असे म्हटले आहे की, हा आंतरिक प्रवास फक्त अनुभवता येतो. व्यक्त केला जाऊ शकत नाही. या भावनांची खोली, विस्तार आणि तीव्रता शब्दबद्ध करण्यास मी असमर्थ आहे. हा माझ्यासह सर्व भारतीयांसाठी आणि प्रभु रामचंद्रांच्या भक्तांसाठी एक पवित्र प्रसंग आहे. प्रत्येक जण २२ जानेवारी रोजी त्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. रामजन्मभूमीवर रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. त्या पवित्र सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार, हे आपले भाग्यच आहे.
(हेही वाचा – Prabha Atre: भारतरत्न, पद्मविभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन)
राम मंदिराच्या पूर्ततेचे स्वप्न झाले
आपण जेव्हा अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणाचे साक्षीदार होऊ तेव्हा मनात राममंदिराच्या पूर्ततेचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य भारतीयांची मने आनंदाने भारावून जाणार आहेत. जनाता ही देवाचेचे रूप आहे आणि त्यांची ऊर्जा घेऊन ते मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतील. त्यांनी जनतेला आशीर्वाद देण्याची विनंतीही केली आहे.
कोणते यम-नियम पाळणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांनी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान कसे करणार हे सांगितले आहे. यावेळी ते काही आध्यात्मिक साधकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष विधी करणार. धर्मग्रंथातील नियमांचे कठोर आणि काटेकोर पालन करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. याकरिता विशेष विधीही त्यांनी सुरू केला आहे.
प्राण-प्रतिष्ठा से पूर्व 11 दिवसीय व्रत अनुष्ठान का पालन मेरा सौभाग्य है। मैं देश-विदेश से मिल रहे आशीर्वाद से अभिभूत हूं। https://t.co/JGk7CYAOxe pic.twitter.com/BGv4hmcvY1
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024
धर्मग्रंथातील यम-नियमांचे काटेकोर पालन
या अनुष्ठानाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी कामाचा खूप व्याप असूनही धर्मग्रंथातील यम-नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते ११ दिवस यम-नियमांचे पालन करणार आहेत. योग-ध्यानासह विविध व्रतांचे कठोरपणे पालन करणार आहेत. याकरिता मोदी सूर्यादयापूर्वी ब्राह्म मुहूर्तावर उठतात. ध्यान करतात. सात्त्विक आहार घेतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community