- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंडचा अनुभवी तेज गोलंदाज टीम साऊदीने टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारी एक ऐतिहासिक मापदंड सर केला आहे. या प्रकारात १५० बळी टिपणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत ऑकलंड इथं २५ धावांत ४ बळी घेत साऊदीने हा टप्पा सर केला. अब्बास आफ्रिदी त्याचा दीडशेवा बळी ठरला. (150 Wickets in T20)
टीम साऊदीच्या खात्यात आता ७४६ आंतरराष्ट्रीय बळी जमा झाले आहेत. (150 Wickets in T20)
History for Tim Southee 🙏
The first player ever to reach 150 T20 international wickets 👏 #NZvPAK #CricketNation pic.twitter.com/mhcAAniy8V
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 12, 2024
(हेही वाचा – Akshar Patel on Team Selection : टी-२० विश्वचषकासाठी माझी स्पर्धा माझ्याशीच आहे)
टीम साऊदीच्या पाठोपाठ बांगलादेशचा शकीब अल हसन १४० बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रशिद खान १३० बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचाच इश सोधी चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात १२७ बळी आहेत. (150 Wickets in T20)
सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानबरोबर ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. आणि यातील पहिल्या सामन्यात किवी संघाने पाक संघाचा ४६ धावांनी पराभव केला. किवी संघाच्या या विजयात केन विल्यमसन, डेरिल मिचेल आणि टीम साऊदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (150 Wickets in T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community