दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर उबाठाने दावा केल्यानंतर त्याला देवरा यांनी प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात देवरा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र पक्षनेत्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता दुर्लक्ष केल्यामुळे देवरा नाराज झाले, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. अशातच आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (Uday Samant)
(हेही वाचा – Sadhus Assault : पश्चिम बंगालमध्ये ३ साधुंना बेदम मारहाण, १२ जणांना अटक)
देवरा शिवसेनेत आल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी पक्ष त्यांचा विचार करू शकतो. सद्या हा मतदार संघ भाजपकडे असून शिंदे या जागेसाठी आग्रह धरतील किंवा देवरा यांचा राज्यसभेसाठी विचार केला जाऊ शकतो, असे एका देवरा समर्थकाने सांगितले. (Uday Samant)
(हेही वाचा – LK Advani : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक)
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार, उद्यापासून काय होतेय ते पाहा, ठाकरे गटावर पक्षफुटीची महासंक्रात येणार” अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.
(हेही वाचा – Akshar Patel on Team Selection : टी-२० विश्वचषकासाठी माझी स्पर्धा माझ्याशीच आहे)
नेमकं काय म्हणाले उदय सामंत ?
उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दावा सामंतांनी केला आहे. रत्नागिरीमध्ये (Uday Samant) उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
मिलिंद देवरा शिवसेनेत येणार का?
मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल, असे उदय सामंत म्हणाले. मिलिंद देवरा लोकांमध्ये जावून काम करणारे नेतृत्व आहे. मुरली देवरा साहेबांचा त्यांना वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात, असेही सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community