IndiGo Flight Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचे ढाका येथे लँडिंग; कारण वाचा सविस्तर

IndiGo Flight Emergency Landing : खराब हवामानामुळे हे विमान आसामच्या गुवाहाटी विमानतळावर उतरू शकले नाही. आसाम (Assam) शहरापासून 400 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या ढाका विमानतळाकडे वळवण्यात आले.

240
IndiGo Flight Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचे ढाका येथे लँडिंग; कारण वाचा सविस्तर
IndiGo Flight Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचे ढाका येथे लँडिंग; कारण वाचा सविस्तर

मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे शनिवार, १३ जानेवारी रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे लॅंडिंग करावे लागले. (Mumbai-Guwahati IndiGo Flight) दाट धुके हे यामागचे कारण आहे. धुक्यामुळे विमान आसाममधील गुवाहाटी विमानतळावर (Guwahati Airport) लॅंडिंग करू शकले नाही.

(हेही वाचा – Sadhus Assault : पश्चिम बंगालमध्ये ३ साधुंना बेदम मारहाण, १२ जणांना अटक)

इंडिगोचे 6E 5319 (Indigo 6E 5319) हे विमान मुंबईहून गुवाहाटीला जात होते. खराब हवामानामुळे हे विमान आसामच्या गुवाहाटी विमानतळावर उतरू शकले नाही. आसाम (Assam) शहरापासून 400 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या ढाका विमानतळाकडे वळवण्यात आले. हे विमान गुवाहाटीऐवजी बांगलादेशातील ढाकाकडे (Dhaka) वळवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

पारपत्राशिवाय ओलांडली आंतरराष्ट्रीय सीमा

इम्फाळ येथे काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणार असलेले मुंबई युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सूरज सिंग ठाकूर यांनी एक्स (ट्विटर) वर एका पोस्टमध्ये लिहिले की, ते मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या त्याच विमानात होते. खराब हवामानाचे कारण असले, तरी त्यामुळे विमानाने आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडली. विमानातील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पारपत्रांशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली.

(हेही वाचा – Ishan Kishan Selection Mess : ईशान किशन संघ निवडीच्या चक्रव्यूहात फसला आहे का?)

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,” “मी आता 9 तास विमानात अडकलो आहे.” भारत जोडो न्याय यात्रेसाठी मी मणिपूरला (इंफाळ) रवाना झालो आहे. बघूया मी गुवाहाटीला (Guwahati) कधी पोहोचतो आणि नंतर कधी एकदा इंफाळला विमानाने जातो.’

इतर प्रवाशांनीही त्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम खात्यांवर या घटनेची माहिती दिली. (IndiGo Flight Emergency Landing)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.