-
ऋजुता लुकतुके
२०२४ सालचा रणजी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या हंगामाच्या वरिष्ठ गटात खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सामनावीर पुरस्कारासाठी पदकं देण्यात यावीत, असं बीसीसीआयने राज्य संघटनांना सुचवलं आहे. अगदी अलीकडे तसं पत्रकच बीसीसीआयने प्रसिद्ध केलं आहे.
आधीच्या हंगामापर्यंत रणजी करंडक या देशांतर्गत कसोटी क्रिकेट स्पर्धेत सामनावीर खेळाडूला २५,००० रुपये रोख दिले जात होते. सामना भरवणारी यजमान राज्य संघटना हे बक्षीस देत होती. आता सामनावीर पुरस्कारासाठी एक पदक आणि प्रत्येक सामन्यासाठी नवीन पदक देण्यात यावं, असं बीसीसीआयला वाटतं. त्यामुळे खेळाडूंकडे आठवण म्हणून हे पदक राहील, अशी बीसीसीआयची भावना आहे. पण या पत्रकात आधीप्रमाणे बक्षिसाची रक्कम सुरू राहील का हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
(हेही वाचा – Uday Samant : ठाकरे गटावर पक्षफुटीची महासंक्रात येणार; लवकरच… – उदय सामंत यांचा मोठा दावा)
बीसीसीआयने याविषयीचं एक पत्रक सामनाधिकारी आणि सर्व राज्य संघटनांना पाठवलं आहे. ‘तुमच्या हे निदर्शनास आणून देण्यात येत आहे की, बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना या हंगामातील सर्व रणजी करंडकाच्या सामन्यांसाठी पदकं पाठवली आहेत. ही पदकं सामनावीर पुरस्कारासाठी देण्यात यावीत. आणि प्रत्येक सामन्याचा एक सामनावीर असावा,’ असं या पत्रकात म्हटलं आहे.
भारतात फक्त आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएलमध्येच पदकं देण्यात येत होती, पण या हंगामापासून बीसीसीआयने देशांतर्गत सामन्यांसाठीही पदकं देण्याची पद्धत सुरू केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community