- ऋजुता लुकतुके
काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी आठवड्यातले ७० तास तरुणांनी काम केलं, तर भारत प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल, असं विधान करून खळबळ उडवून दिली होती. काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल यावर मग जोरदार चर्चा झडली. आता नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांनी या विधानाचं समर्थनच केलं आहे. (70-Hour Workweek)
‘मी या वयात आठवड्याला ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम करते. मग तरुणांना तसं करायला काय हरकत आहे? आणि काम आवडीचं असेल तर तेच सुटी सारखं वाटतं,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘माझी व्याख्या ही आहे की, तुमचं काम हेच तुमचं प्रेम असलं पाहिजे. तुमच्या कामाचा आनंद लुटता आला पाहिजे. तर हे शक्य आहे,’ असं पुढे सुधा मूर्ती (Sudha Murthy) म्हणाल्या. (70-Hour Workweek)
(हेही वाचा – Delhi liquor scam : केजरीवालांना ईडीचे चौथे समन्स; आपने केले ‘हे’ आरोप)
७० तासांचा आठवडा आणि वाद
नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी काही महिन्यांपूर्वी इंडिया टूडे वृत्त वाहिनीला मुलाखत देताना हे विचार मांडले होते. भारताची उत्पादकता तुलनेनं कमी आहे. आणि ती वाढवायची असेल तर तरुणांनी काम केलं पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला होता. आणि तो मांडताना आठवड्याला ७० तास काम करण्याच्या प्रस्तावाचा मी खंदा पुरस्कर्ता आहे, असं विधान केलं होतं. (70-Hour Workweek)
मात्र त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या. इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनीही सोशल मीडियावर ‘इन्फोसिसमध्येही त्यासाठी आवश्यक पगार मिळत नाही,’ अशी तक्रार केली होती. तर ७० तास काम केल्यावर कुटुंबाला वेळ कधी द्यायचा असाही प्रश्न समोर आला होता. (70-Hour Workweek)
त्यानंतर आता पुन्हा एकदा सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांनी हाच वाद परत छेडला आहे. संसदेबाहेर मीडियाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. (70-Hour Workweek)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community