Massive Fire : डोंबिवलीत बहुमजली इमारतीच्या ११ मजल्यांना लागली भीषण आग

सुदैवाने इमारतीत फक्त तिसऱ्या मजल्यापर्यंत लोक राहतात आणि आग लागल्यानंतर लगेचच येथे राहणाऱ्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

251
डोंबिवली जवळील खोणी पलावा येथील टॉवरला शनिवारी भीषण आग (Massive Fire) लागली. या इमारतीमधील ११ मजले या आगीच्या कवेत आले आहेत. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.

शॉर्टसर्किटमुळे लागली भीषण आग 

डोंबिवली परिसरातील एका बहुमजली निवासी इमारतीला आग (Massive Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीजवळील खोणी पलावा येथील एका इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आग सातव्या मजल्यावर लागली आणि काही वेळातच वरच्या ११ मजल्यांपर्यंत आग पोहचली. सुदैवाने इमारतीत फक्त तिसऱ्या मजल्यापर्यंत लोक राहतात आणि आग लागल्यानंतर लगेचच येथे राहणाऱ्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यात इमारतीला भीषण आग (Massive Fire) लागल्याचे दिसत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.