शिवसेना उबाठा (UBT) पक्षाने अयोध्येतील रामजन्मभूमी येथील भव्य मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याच दिवशी, २२ जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात महापूजन आणि महाआरतीचे आयोजन केले आहे. तसेच या महाआरतीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले असून याची माहिती देत असतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण या सोहळ्याचे राजकारण करत नसल्याचा निर्वाळा दिला आहे, हे विशेष.
प्राणप्रतिष्ठापणा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते व्हावी
अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अयोध्येच्या मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवी, अशी अपेक्षा केली आणि वर आपण यावर राजकारण करत नाही, असा निर्वाळा दिला.
(हेही वाचा Eknath Shinde : उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना घरगडी, नोकर समजतात; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल )
ठाकरेंकडून राजकारण
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे यांना उत्तर देत ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोट्यवधी लोकांच्या भावना गुंतलेल्या राम मंदिर विषयाचे राजकारण नाही तर दुसरं काय करत आहेत? असा सवाल केला.
रामाची मूर्ती दिसेल का?
काळाराम मंदिरात जी आरती करणार आहे, त्या आरतीचे राष्ट्रपतींना आमंत्रण देणार असल्याचा उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले तर अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्यात अटलजींचा फोटोच कुठे दिसला नाही आणि त्यामुळे राम मंदिराच्या सोहळ्याच्या वेळी राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती दिसेल का? याबाबत उद्धव ठाकरेंनी शंका उपस्थित केली. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवा अशी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मागणी केली. अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची आहे, असे ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community