Shiv Sena महिला विभागीय आणि संपर्क नेत्यांच्या नियुक्त्या, ‘या’ महिला नेत्यांवर सोपवली पक्षाने जबाबदारी

शिवसेना पक्षाच्या महिला सेनेच्या विभागीय नेत्या आणि विभागीय संपर्क नेत्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या फळीतील महिलांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

277
निवडणुकांच्या तोंडावर Shiv Sena पदाधिकाऱ्यांना लॉटरी; 'या' सदस्यांची नियुक्ती

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचेच आहे, असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्यानंतर आता शिवसेनेने राज्यात पक्ष संघटन वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या महिला सेनेच्या विभागीय नेत्या आणि विभागीय संपर्क नेत्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या फळीतील महिलांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Shiv Sena)

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व स्व. आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेनेच्या विभागीय नेत्या व विभागीय संपर्क नेत्या या पदावर खालील नियुक्त्या शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : पंतप्रधानांच्या मंदिर स्वच्छतेनंतर मुख्यमंत्र्यांनी केली ‘या’ मंदिराची स्वच्छता)

यामध्ये मिनाताई कांबळी, डॉ. निलम गोऱ्हे, खासदार भावना गवळी यांच्यावर महिला विभागीय नेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर आमदार डॉ. मनीषा कायंदे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा कारंजे यांच्यावर महिला विभागीय संपर्क नेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. (Shiv Sena)

शिवसेना महिला विभागीय नेत्या

मीनाताई कांबळी (कोंकण, उत्तर महाराष्ट्र), डॉ. नीलमताई गोऱ्हे (पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा), खासदार भावनाताई गवळी (पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ) (Shiv Sena)

शिवसेना महिला विभागीय संपर्क नेत्या

आमदार डॉ. मनीषा कायंदे (पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ), शीतल म्हात्रे (कोंकण विभाग), तृष्णा विश्वासराव (पश्चिम महाराष्ट्र), सुवर्णा करंजे (उत्तर महाराष्ट्र) (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.